उमेद-अभियान अंतर्गत महिलांनी लघु, कुटीर व मोठे उद्योग निर्माण करून उपजीविका निर्माण करून स्वावलंबी बनावे व महिला पण व्यवसायास सक्षम आहेत हे दाखवून द्यावे – गणेश कवडेवार (जिल्हा व्यवस्थापक-उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान MSRLM)

1,035

नांदेड :- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष नायगाव अंतर्गत कृष्णूर येथील महिला स्वयं सहाय्यता समूहाच्या लघु उद्योग व व्यवसाय करणारे समूह याना उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवास्थापन कक्ष नांदेड येथील जिल्हा व्यवस्थापक श्री धनंजय भिसे व श्री कवडेवार यांनी दिली भेट दिली त्या भेटीत त्यांनी कृष्णूर या गावात विविध उद्योग व व्यवसाय करणारे समूह पत्रावळी तयार करणे, मिरची व हळद कांडप,पिठाची चक्की,कापड व्यवसाय,शिलाई व्यवसाय,बांगडी व्यवसाय याना भेट दिली एकाच गावात उमेद अंतर्गत समूह मार्फत विविध उद्योग व व्यवसाय सुरु असल्या बाबत समाधान व्यक्त केले.

जे व्यवसाय करत आहात त्यांना लेबलिंग, ब्रँडिंग व मार्केटिंग करण्याबाबत प्रवृत्त करण्यात आले, उमेद अंतर्गत कौशल्य विकास व स्वतंत्र विभाग असून त्या मार्फत विविध प्रशिक्षणे दिली जातात ते प्रशिक्षण घेऊन कामात कौशल्यपूर्ण सुधारणा करावी या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांनी स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनावे या बाबत सांगितले. समूहांनी अन्न व प्रक्रिया उद्योग PMFME अंतर्गत नोंदणी करावी, खाद्य उद्योग आहेत त्यांनी फूड लायसन काढून घ्यावे या सर्व गोष्टीसाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष मदत करेल या बाबत माहिती दिली.

यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक श्री अमोल जोंधळे,कृष्णूर येथील ICRP मधूताई कागडे,उद्योग व व्यवसाय करणाऱ्या महिला व समूहातील महिला व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

2 Comments
  1. अमोल says

    सर्वात फास्ट आणि अगोदर बातमी लागते सरजी

    1. धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.