जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘त्या’ पत्राने मेळगाव ग्रा.प. च्या दोन जागेची निवडणूक होणार का नाही याबाबत संभ्रम

तहसिलदार यांनी पाठविलेल्या अहवालावरती अमंलबजावणी करीत जिल्हाधिकारी कार्यालय यांनी येथील दोन जागेची पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

1,210

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : तालुक्यातील मेळगाव येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त दोन अनुसुचित जातीच्या पोट निवडणूक तात्काळ थांबवण्याची मागणी वैजनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. सदरच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. ७ डिसेंबर रोजी नायगाव तहसीलदार यांना पत्र पाठवून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येवून त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा असे आदेश दिल्याने निवडणूक होणार का नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मेळगाव ता. नायगाव येथील वैजनाथ नारायण शिंदे, मेळगाव ता.नायगांव यांनी जिल्हाधिकारी नांदेड याचेकडे निवेदन देवून मेळगाव येथील ग्रामपंचायतचे सदस्य चंद्रकला प्रदिप धसाडे, एस.सी. महिला प्रवर्ग व अमोल रामानंद महिपाळे, या दोन सदस्यांना कलम १६ अन्वये अपात्र घोषित केले होते. या निर्णयाच्या विरोधात दोन्ही अपिलार्थीनी विभागीय अप्पर आयुक्त औरंगाबाद येथे अपिल सादर केले होते. अपात्र झालेल्या सदस्यांच्या बाबतीत विभागीय अप्पर आयुक्त औरंगाबाद यांचा आदेश अंतिम असतो व या अपिलावर अंतिम निर्णय पारित झाल्यानंतरच सदस्यांचे पद रिक्त होते अशी कायदयात तरतुद आहे.

नायगाव गटविकास अधिकारी व तहसिलदार नायगाव यांनी आयुक्त औरंगाबाद यांचा अंतिम निर्णय होण्याची प्रतिक्षा न करता सदरील प्रकरणात अत्यंत घाईघाईत रिक्त जागेचा अहवाल पाठविला आहे. तहसिलदार यांनी पाठविलेल्या अहवालावरती अमंलबजावणी करीत जिल्हाधिकारी कार्यालय यांनी येथील दोन जागेची पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. अमोल महिपाळे या अपिलाचा निर्णय दि.११ नोव्हेंबर २०२१ रोजी पारित झाला आहे. सदरीलची बाब कायदयाशी विसंगत निर्माण करणारी असल्याने साहेबांनी तात्काळ मेळगाव येथील दोन रिक्त ग्रामपंचायत सदस्य पोटनिवडणूक कार्यक्रम थाबविण्याचे आदेश देण्यात यावे ही विनंती केली होती.

सदर प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने दि. ७ डिसेंबर रोजी नायगाव तहसीलदारांना पत्र पाठवून निवेदनाच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाचे निर्णय,आदेश, शासनाचे आदेश निर्देशाचे पालन करून तसेच मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करून योग्य ती कार्यवाही करण्यात येवून त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा असे स्पष्ट आदेश दिले असल्याने खळबळ उडाली आहे. पण सदरची निवडणूक होणार का नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदरची निवडणूक अद्यापर्यंत स्थगित झाली नाही पण याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून किंवा मार्गदर्शन मागवून निर्णय घेवू

गजानन शिंदे, तहसीलदार नायगाव.

2 Comments
  1. Ganesh says

    👍👍

    1. धन्यवाद

Leave A Reply

Your email address will not be published.