उष्णतेचे प्रमाण वाढले….शितपेय दुकाने गजबजली पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर यांच्या निवासस्थानी पक्षाची किल-बिल वाढली

278

सुभाष पेरकेवार

नरसी फाटा :- सध्या सुर्य आग  ओकत  असुन पडणार्‍या  कडक  उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असतानाच ग्रामीण भागातील शितपेय दुकाने गजबजली आहेत रानावनात कुठेच थेंबभर पाणी पियायला मिळत नसल्याने पक्षाची देखील गावाकडे ओढ वाढली असतानाच जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांचा निवासस्थानी सकाळ संध्याकाळ पक्षांची किलबिल पहायला मिळते विशेष म्हणजे पाच सहा मडक्याच्या डोरल्यात पाणी भरून ठेवताच गारे गार पाणी पिण्यासाठी आपसुक पक्षाची झेप घराकडे येते. चार पाच ठिकाणी पाणी ठेवलेले असल्यामुळे येतात थंड पाणी पितात थोडा विसावा घेवून परत आकाशात झेपावतात हे मनमोहक दृश्य दररोज पहायला मिळते.

गत काही दिवसापासुन उष्णतेची तिव्रता वरचेवर वाढत होत असुन सकाळच्या  11 वाजल्यानंतर उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत ग्रामीण भागात रसवंत्यासह ज्युस सेंटर व शितपेयांची दुकाने बहरु लागली आहेत गावासह राज्य महामार्गावर  मोक्याच्या ठिकाणी व फाट्यावर रसवंत्यावर गर्दी होत आहे.
यंदा मार्च मध्यापासूनच ऊन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली एप्रिल महीण्याच्या पहील्या आठवड्यापासून तर तिव्रता जाणवू लागली.सध्या सकाळी दहा नंतर  घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. दुपारी होणारी उष्णतेची तिव्रता यामुळे अंगाची लाही लाही होत आहे.

ऊन्हाची चाहूल लागताच ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात शितपेयांचे दुकाने थाटली आहेत. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून कोरोना सारख्या महामारीने हैराण करून सोडले होते पण यंदा रसवंती ग्रहांना या भागात चांगलीच  बहर आला असून महामार्गावर फाट्यावर अनेकांनी रसवंतीग्रह उभारली आहेत. उन्हात नागरिकांनी रस पिण्यासाठी सर्वांधिक पसंती दिली असल्याचे दिसून येते आहे.

नरसी यासह अनेक गावात ज्युस सेंटर चालू झाली आहेत. ऊन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरिक थोडा वेळ विश्रांती घेण्याबरोबरच थंड ऊसाचा रस पिण्याला पसंती देत आहेत. उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिक आतापासूनच आरोग्याची काळजी घेतांना दिसून येत असल्याने दुपारच्यावेळी शहरात गर्दी रोडावली आहे.

दररोज वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाला असताना पशु पक्षी देखील पिण्याच्या पाण्यासाठी शहराकडे धाव घेतली आहे. शेकडो नागरिक आपल्या घराबाहेर बादली भरून पाणी ठेवताना दिसून येतात नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुर्यकांत सोनखेडकर यांनी देखील आपल्या घरासमोर दररोज चार पाच मडक्याच्या डोरल्यात पाणी न विसरता सकाळी भरुन ठेवतात सकाळी नऊ वाजता व संध्याकाळी पाच सहा वाजता पक्षी न विसरता येऊन पाणी पितात व मनमोहक दृश्य दररोज पहायला मिळते.

आपण पाणी पितो मुक्या प्राण्यांच काय हे विचार लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर पशु पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे गरजेचे असल्याचे मत सुर्यकांत सोनखेडकर यांनी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.