दररोज सकाळी एक तास सायकल प्रवास शिक्षकांनी एका महिन्यात केले १२०० कि.मी.अंतर पार
सुभाष पेरकेवार
नरसी फाटा :- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. संपत्ती पेक्षा शारीरिक संपत्ती अधिक महत्त्वाची असून दररोज व्यायाम करा सायकल चालवा असा संदेश देत बिलोली तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी दररोज सकाळी बिलोली नरसी आदमपुर मार्ग किमान ८० कि.मी.चा प्रवास सायकल वर करतात. एका महिन्यात जवळपास १२०० कि.मी.चा प्रवास पुर्ण केले आहे.
आजकाल धावपळीच्या युगात माणसांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत कामाच्या व्यापात व्यस्त होतांना मुळात आरोग्यदायी जिवन शैली जगण्यासाठी आवश्यक सकाळी किमान एक तास तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात तुरळक मंडळी रामप्रहरी चालतांना आढळून येतात.
बिलोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगाथडी येथील शिक्षक बालाजी लच्छागोड गेंदेवाड हे मात्र सध्या या भागात चर्चेत आले. मुळात शैक्षणिक कार्यासोबत अनेक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग राहिला आहे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या उपक्रमाअंतर्गत नुकताच कार्ला बू. येथील शाळेत वृक्षांचा वाढदिवस साजरा करुन या परिसरात एका नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून नोंद झाली होती.
मुळात गेंदेवाड यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला असला तरी त्यांची सायकल स्वारी चर्चेत आली. बालवयापासूनच व्यायाम ची तर आवड न चुकता करतातच पण गेल्या काही महिन्यांपासून ते सायकल स्वारी सुरू केली. गेल्या एका महिन्यात त्यांनी १२०० कि.मी.चा टप्पा पार केला.
सकाळी सकाळी बिलोली हुन नरसी, शंकरनगर,खतगाव मार्ग बिलोली असा दैनंदिन सायकल प्रवास सुरू आहे. यामुळे गुरूजींच्या या नव्या संकल्पनेची चर्चा होत आहे विशेष म्हणजे प्रत्येक नागरिकाने वेळेतला वेळ काढून आपल्या आरोग्यासाठी सायकल प्रवास करणे गरजेचे असल्याचे गेंदेवाड यांनी पत्रकारांशी सांगितले.