महामानवास स्ट्रॉग गोल्ड ब्ल्यू फाऊंडेशनच्यावतीने कृतीतून अभिवादन

लोकशाहीचा रक्षक’ ने पत्रकारांचा होणार गौरव

118

अंकुशकुमार देगावकर

नांदेड :- भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या दि.6 डिसेंबर रोजी स्ट्रॉग गोल्ड ब्ल्यू फाऊंडेशनच्यावतीने संयोजक रवी राजीव भोकरे यांच्यावतीने कृतीतून अभिवादन करण्यात येणार आहे. याच वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत लोकशाहीला बळकट करणार्‍या पत्रकारांचा लोकशाहीचा रक्षक या सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासून स्ट्रॉग गोल्ड ब्ल्यू फाऊंडेशनच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतीतून अभिवादन हा आगळा-वेगळा सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी उद्या दि.6 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमातील पत्रकारांचा लोकशाहीचा रक्षक हा सन्मान देवून गौरव करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ पार पडणार्‍या या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होईल. यावेळी विरपत्नी श्रीमती शितलताई संभाजी कदम यांच्यासह विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोली, सिईओ वर्षाताई ठाकूर, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, आयुक्त सुनिल लहाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 5 वाजता चेतन लोखंडे आणि भाग्यश्री इंगळे यांच्या भिमगितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संपुर्ण सोहळ्यास जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक रवी राजीव भोकरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.