अनुसूचित जाती, जमाती यांना विशष घटक योजने अंतर्गतवाटप केलेल्या दुधाळ गटाच्या अनुदानची वसुली /सातबाऱ्यावरील बोझा तात्काळ रद्द करा

241

 

अंकुशकुमार देगावकर

नांदेड :- पशु संवर्धन विभागा अंतर्गत विशष घटक योजनेतर्गत सन 2014/2015 या आर्थिक वर्षात नायगाव तालुक्यातील 26 लाभार्थ्याना वाटप करण्यात आलेल्या अनुदानची रक्क्म वसुली /व सातबाऱ्यावर बोझा टाकण्यासाठी तहसीलदार नायगाव यांच्या मार्फत (RRC) रेव्हेनू रिकव्हरी सिर्टिफिकेट समितीच्या माध्यमातून लाभार्थ्याना तात्काळ वसुली भरा अन्यथा तुमच्या सातबाऱ्यावर बोझा टाकण्यात येईल असे तलाठी मंडळ अधिकारी हे तगादा लावत आहेत.

मुळात पशु संवर्धन विभागाने या बाबत चौकशी करून अनुदानचा गैरवापर केल्याचा चौकशी अहवाल पशुधन विभागाने (RRC ) समितीकडे पाठवला आहे पशुधन विभागाने याबाबत लाभार्थी यांना कोणतीही पूर्व कल्पना, किंवा नोटीस न देताच चौकशी केली जे कि अन्यायकारक आहे, कारण काही लोकांकडे आजही दुधाळ जनावर आहेत, काहींनी वैरणाचा प्रश्न येत असल्याने नातेवाईकांकडे जनावर ठेवले आहेत.

मग अनुदानचा गैरवापर कसा होतो, ही संशोधनांचा विषय आहे, साध्यच्या परिस्थितीत सलग कोरडा दुष्काळ, व नायगाव तालुकॅतील अर्ध्याच्या वर गावात कोरडंवाहू जमिनी, त्यातच कोविड 19 चे संकट यातून लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच नांदेड जिल्यातील 15 तालुके सोडून फक्त नायगाव तालुक्यातील लाभार्थी यांचीच वसुली प्रशसासन का करत आहे ते कळायला मार्ग नाही.

या प्रकरणी आज दिनांक 07 रोजी मा.अप्पर जिल्हाधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेऊन निवेदन देऊन वसुली तात्काळ रद्द करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले या वेळी, वंचित बहुजन आघाडी चे महानगर दक्षिण चे महासचिव अमृत नरंगलकर, वंचित चे जेष्ठ नेते के. एच. वन्ने, जेष्ठ नेते भाऊराव भदरगे, नायगाव प.स.चे माजी उपसभापती माधव गजभारे, वंचित चे नेते प्रकाश कोल्हे, बाबुराव झगडे, मधुकर झगडे, एकनाथ वाघमारे, दैवशाला नागोराव डुमने, पत्रकार सुनील कांबळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या वेळी प्रशासनाने तात्काळ वसुली रद्द नाही केल्यास वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल असे अल्टीमेट प्रशासनाला देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.