किनाळा येथे गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

960

मोरे मनोहर

किनाळा :- राजकीय पुढाऱ्यांचा किंवा स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो परंतु किनाळा तालुका बिलोली येथील गजानन पाटील भोसले यांच्या वाढदिवसासाठी त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने गरीब व होतकरू गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणि रुग्णांना फळे वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी गजानन पाटील भोसले यांनी माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा किनाळा येथूनच झाले असून ज्या शाळेत आपण शिक्षण घेतलो आहोत त्याचे काही तरी देणं आहे ह्या पवित्र भावनेतून वाढदिवसावर वायफळ खर्च करण्याऐवजी वाढदिवसानिमित्त होणारा हा खर्च आपण शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी व रुग्णांना फळे वाटप करून हा वाढदिवस साजरा केला तर खऱ्या अर्थाने आपण माझा वाढदिवस साजरा केला याचे मला अधिक समाधान मिळेल असे माझ्या मित्र मंडळाला सांगितले असता त्यांनी जो हा निर्णय घेतला असल्याचे सांगितल्याने गजानन पाटील भोसले मित्र मंडळाच्या वतीने मित्रांच्या वाढदिवसा निमित्य राजकीय पुढार्‍यांना देखील लाजवेल असा सुंदर उपक्रम राबवल्याने त्यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन करून स्वागत केले.

यावेळी गावचे उपसरपंच बालाजी पाटील भोसले, पंजाब पाटील भोसले, सोमेश शेटकर, अनिल सावकार, पांडुरंग खनपट्टे, प्रवीण पाळेकर, स्वप्निल जाधव, शिवदर्शन वाघमारे, स्वप्निल शेटकर, नारायण वडमिले, हनुमंत होळकर, शिवकुमार कोटगिरे, ओमकार उपलवार, रुपेश उरकूटवार, परमेश्वर भोसले, ओमकार उपालवर, शिवराज उपलवार,ओमकार लष्करे, ज्ञानेश्वर वडमिले, शादुल सय्यद परिसर मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 Comments
  1. Gajanan Patil bhosle says

    धन्यवाद सर ❤️🙏🏻

Leave A Reply

Your email address will not be published.