महार रेजिमेंटचे नायब सुभेदार अविनाश साबळे यांनी अमेरिकेत रचला इतिहास

३० वर्ष जुना विक्रम टाकला मागे

1,420

New Bharat Times नेटवर्क

भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटचे नायब सुभेदार अविनाश साबळे यांनी 13:25:65 वाजता निमंत्रण चषक USA मध्ये 5000 मीटरमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम रचला. त्याने 1992 मध्ये यूकेमध्ये बनवलेला बहादूर प्रसादचा 30 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला.

बीड जिल्ह्यातील अविनाशने अमेरिकत झालेल्या या स्पर्धेत बहादुर प्रसादने ३० वर्षापूर्वी केलेला विक्रम मागे टाकला. अविनाशने १३.२५.६५ या वेळेत ५ हजार मीटर हे अंतर पार केले, त्याला १२वा क्रमांक मिळाला.

अविनाश हा बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. अविनाश लहानपणी ६ किलोमीटर अंतर पार करून शाळेला जात असे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करतोय.

अविनाशने गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम गेला होता. तेव्हा अविनाशला अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळाले नव्हते. पण त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल सर्वांनी घेतली होती.

त्याने ३ हजार मीटर स्टीपलचेस रेस ८.१८.१२ मिनिटात पूर्ण केली आणि मार्च महिन्यात फेडरेशन कपमध्ये केलेला ८.२०.२० चा स्वत:चा विक्रम मोडला. तो दुसऱ्या हीट स्पर्धेत सातव्या स्थानावर राहिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.