मोटारसायकलने धडक दिल्याने एकाचा मृत्यू

159

मोरे मनोहर

किनाळा :- भोपाळा येथे मुलीला सोडून गावाकडे परत जाण्यासाठी निघालेल्या वडिलांचा नांदेड देगलूर राज्य महामार्गावर भोपाळा पाटील जवळ रस्ता ओलांडताना मोटर सायकलची धडक लागून जागीच ठार झाल्याची घटना दि.26 मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली असून 27 मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास त्यांचा इब्राहिमपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या अपघातातील मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की इब्राहिमपूर तालुका देगलूर येथील हुलाजी संभाजी इंगळे वय वर्ष 50 हे त्यांच्या मुलीला तिच्या सासरी भोपाळा तालुका नायगाव येथे सोडुन परत गावाकडे जाण्यासाठी नांदेड देगलूर राज्य महामार्गावर भोपाळा पाटीजवळ रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलने जोराची धडक दिल्याने डोक्याला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला. तर नायगाव येथील रघुनाथ विठ्ठल कुलकर्णी वय वर्षे 40 हा मोटर सायकलस्वार गंभीर जखमी झाला.

हि घटना घडल्याचे समजताच रामतीर्थ पोलीस स्टेशनचे दशरथ जांभळीकर प्रकाश तमलुरे , व्यंकट बोडके यासह भोपाळा येथील भाजपाचे कार्यकर्ते आनंदराव पाटील बावणे, शंकरनगर येथील पत्रकार हनमंत पाटील वाडेकर, गोविंद पाटील देगलूरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही नायगाव येथील रुग्णालयात पाठवले असता ‌इंगळे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने घोषित केले.

हुलाजी इंगळे यांचे दि.27 मार्च रोजी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी एक वाजता इब्राहिमपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नांदेड देगलूर राज्य महामार्गावर रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 मार्च रोजी एकाच दिवशी वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून या महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.