वझरगा पुलाजवळ झालेल्या तीन वाहनाच्या विचित्र अपघातात सात जन गंभीर जखमी

505

मोरे मनोहर

किनाळा :- नांदेड देगलूर राज्य महामार्गावर वझरगा पुलाजवळ एक कंटेनर एक इनोवा गाडी आणि कार अशा वेगवेळ्या तीन वाहनांचा विचित्र भीषणअपघातात विविध राज्यातुन बिदर कडे जाणारे सात भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना दि. 27 मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

सविस्तर माहिती अशी की पंजाब, छत्तीसगड, दिल्ली, विशाखापटनम, नांदेड येथुन बिदर येथील गुरुद्वाराच्या दर्शनास जाण्यासाठी निघालेल्या भाविकांचा वझरगा तालुका देगलूर जवळील फुलाजवळ नांदेड कडून देगलूर कडे जाणारा एक कंटेनर क्रमांक आर जे 14 जीएच 67 86 कंटेनर वर
इनोव्हा गाडी क्रमांक एम एच 26 ए एफ 8808 आणि कार एम एच 19 बिर्जे 7913 या तीन वाहनाचा अपघात होऊन या भीषण अपघातात सात भाविक जखमी झाले आहेत.

यात दमनदीप सिंग सर्वांस वय 34 राहनार छत्तीसगड, मनदीप सिंग बेधारी वय 45 रा.पंजाब ,जगदीश सिंग मरवाह वय 50 रा. छत्तीसगड, गुरदीपसींग बलजितसींग वय 50 रा.विशाखापटनम, सोनिसींग तमन्ना वय 40 रा.नांदेड, हरजीतसींग वय 17 रा.दिल्ली, मनप्रितसींग कुलदिपसींग वय 46 रा.दिल्ली हे गंभीर जखमी झाले.

हा अपघात झाल्याचे समजतात रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नायगाव येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात पाठवून देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.