बितनाळच्या बाल किर्तनकाराने लावले वेढ : आई – वडिल त्यागावर केले अडीच तास किर्तन

539

प्रल्हाद हिवराळे

उमरी : तालुक्यातील बितनाळ येथिल कुमारी निकीताताई विठ्ठल बोक्कावाड ह्या बालीकेने अवध्या १० वर्षात तिसरी मध्ये शिक्षण शिकत अडीच तास मुकपाठ किर्तन करून आई वडिल गावचे नाव रोशन केले आहे. महाराष्ट्रात संताचे अनेक दुष्टांत देत, छञपत्री शिवाजी महाराज , फुले शाहू आंबडेकर यांच्या विचार धारेवर किर्तन करून समाजात सामाजिक बांधीलकी जोपासून किर्तन करणारी पहिली किर्तनकार म्हणजे निकीताताई बोक्कावाड होय.

आई – वडील कुंदुबाच परिरिस्थी बिकट असताना त्यागाने कस जिवण जगावे लागते हे किर्तनातून हभ प निकीताताई यांनी अडीच तासाच्या किर्तणच्या प्रवचनात सांगीतले आहे .
अनेक हिंदूधर्म ग्रंथ पवित्र आहेत असे सांगत गिता, रामायन, महाभारत यामध्ये आई – वडिल – पुत्र प्रेम, कन्याचे योगदान असे उदारणे देवून उपस्थित गावकऱ्याना पारणे फेडण्या सारखे किर्तन करून भारावून टाकले आहे.

संताचे योगदान निस्वार्थी राहते पण संत मानुसकी चे बिज पेरले गेले तेच उगवले आज काल आई वडिलाचा पुत्राना विसर पडल्याने कर्ममाचे पळ भोगवे लागत आहे म्हणून आई -विना तिनी जगाचा मानुस भिकरि आहे . आज काल संताच्या विचाराने जे वागले त्यांचे भले झाल जे संताचे विचार मानत नाहीत त्यांना ईश्वर कर्माचे फळ देतो. सदगुन मानसाला संताला त्या काळात ही विरोद्ध होता आज ही आहे पण संत हे त्यागाने अमर झाले आहे.

जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य प्राणी मरतोच हे अटळ आहे तो कसा जगला पाहीजे हे महत्वाचे आहे. यापुढे किर्तनकार कु. निकीताताई म्हणाले की सुख दुःख किनारे जिवणात येतात पण मुलगा वंशाला पाहिजे पण मुलगी वाट्याला नको म्हणारे खुप व्यक्तीच्या वाटयाला आई – वडिल येतात पण मुलगी ही मुलापेक्षा लग्न झाल्यावर परक्या घरी जातांना आई वडिलाना पाहून परत परत पाहून नात्याचा जिवाळा दाखवून जाते मुलगा संपतीचा वारस म्हणून जन्माला आले तरी मुलगी निस्थार्थ पणे पाखरा सारखे उडून जाते असे अनेक उदारण देत कु निकीताताई यांनी गावच्या असले तरी अश्रू अनावर होईल असे अल्पशा वयात किर्तन करून उपस्थितांना डोळे पानावून सोडले आहे.

किर्तनकार निकीता ताई यांचे कौतुक करीत गावकरी अच्छर्य चकित झाले आहे. शेवटी हभप किर्तनकार निकीता ताई यांनी आळंदी येथिल सर्व मार्गदर्शक यांच्या सह भाऊसाहेब जाहूकर यांचे व गावकऱ्याचे अभार मानून ‘किर्तनाचा समारोप केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.