नांदेडसंपादकीयसामाजिक

बातमी चोर… बोगस पत्रकारांचा सुळसुळाट आणि पत्रकारीता

प्रकाश महिपाळे – नांदेड.

आज काल कोणीही उठतय माईक आणि आयकार्ड घेतोय आणि स्वतःला पत्रकार म्हणून मार्केटमध्ये मिरवतोय आणि या सर्व वृत्तीमुळे पत्रकार मात्र बदनाम होत आहे. पत्रकारिता क्षेत्रात पत्रकारिता करणारे कमी आणि ब्लॅकमेल, कॉपी-पेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गुन्हेगारी क्षेत्रातील किंवा सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोक स्वतःच्या नावाने वृत्तपत्राची नोदंणी करतात. नाही झाले तर बायको, मुलगा, भाऊ किंवा जवळच्या नातेवाईकांच्या नावाने रजिस्टर करतात आणि मार्केटमध्ये संपादक पत्रकार म्हणून लोकांना ब्लॅक मेल करतात किंवा दहशत करतात.

अशा पत्रकारांना प्रशासनाने वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. पञकार परिषदेत किंवा वृत्तांकन करताना प्रश्न विचारतोय का? सल्ला देतोय याचाही भान राहत नाही. मात्र यावर सामाजिक कार्यकर्ते नेते हे मात्र सर्वच पत्रकारांना टारगेट करतात. बोगस पञकारांना खरे तर थारा दिला नाही पाहिजे. गैरसमज मनात धरून संपूर्ण पत्रकार जातीला शिव्या देतात. काही पञकारांनी तर खोटी कागदे बनवुन तयार ठेवली आहेत, आणि लोकांना सांगतात जुना पञकार आहे, सध्याच्या परिस्थितीत कोवीड काळात तर अनेक पत्रकार वाढले आहेत. सरकारी कार्यालय आणि राजकीय कार्यालयात ठामपणे पत्रकार असल्याच्या वावर करतात. त्यामुळे बातम्या खऱ्या खोट्या ओळखणं खूप अवघड झाले आहे.

  • जाहिराती सुरुवातीला मिळत होत्या मात्र आता या बोगस पत्रकारांना मुळे कमी झाले आहेत आणि मोठमोठे चैनल वृत्तपत्र दैनिक, साप्ताहिक, टि.व्हि चॅनल वाले हे मात्र त्या जाहिरात प्रतिनिधींना टार्गेट पूर्ण होत नाही म्हणून काढून टाकतात. संपूर्ण बोगस पत्रकारांची एक जमात तयार झाली आहे ती पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या पत्रकारांसमोर अरेरावीची भाषा करून दमदाटी धाकदपटशा करण्याचा प्रयत्नही करतात त्यामुळे अनेकदा या पत्रकारांकडे दुर्लक्ष केलं जातं मात्र याचा खूप मोठा परिणाम हा समाजावर हि घडत असतो याकडे पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन या स्थानिक संस्थेच्या प्रशासन याकडे लक्ष देईल का यावर ठोस पावले उचलतील का ???
  • पोलीस आयुक्तालय असेल जिल्हा आयुक्तालय असेल या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या सर्व क्षेत्रातील प्रशासनाने त्यांच्या आवारात येणाऱ्या पत्रकारांची चौकशी केली पाहिजे त्यांचे शिक्षण आणि ते पत्रकारितेच्या शिक्षण पारंगत आहेत का या सर्व बाबी तपासल्या पाहिजेत अन्यथा उद्या अजून कोणी उठेल आणि स्वतःला पत्रकार म्हणून कुणाला ब्लॅकमेल करेल कुणाकडे खंडणी मागेल मात्र या सर्व प्रकारांमध्ये पत्रकार जात ही बदनामी होत राहील.

अनेक बोगस पत्रकार समाजामध्ये फिरत असतात शे-पाचशे रुपयांसाठी स्वतःला पत्रकार दाखवतात त्यामुळे समाजाचा पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत आहे पत्रकारांना तुच्छ समजण्यास लोकांची सुरुवात व्हायला लागलेली आहे त्यामुळे यावर ठोस पावले उचलण्याची काळाची गरज आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक स्वताच वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग करत आहेत शहरात खूप पत्रकार झाले आहेत गावात खूप पत्रकार झाले आहेत. शहरात, तालुक्यात, जिल्हात खूप पत्रकार झाले आहेत नक्की कुणाकुणाला बोलवायचं असे अनेक प्रश्न सामाजिक राजकीय नेते विचारत आहेत अचानक एवढे पत्रकार आले कुठून असाही प्रश्न निर्माण होतो मात्र पत्रकारांची छबी याच्यात कुठेतरी बदनाम होत आहे.

पत्रकारितेचे आकर्षण अनेकांना असते. पत्रकारिते भोवती असणारे ग्लॅमर त्यांना मिळणारा मानसन्मान व विशेष वागणूक यांचे आकर्षण असणे गैर नाही. ख-या अर्थाने पत्रकारिता करणा-यास तो मान मिळणे हा त्याचा हक्कच आहे. पत्रकारिता म्हणजे निव्वळ बातमी देणे एवढे मर्यादित नाही. समाजातील समस्या व नागरी समस्यांना वाचा फोडणे, त्यावर भाष्य करणे व उपाय योजना सुचविणे हा देखील पत्रकारितेचाच एक भाग आहे. हे आताचे आणि जुने बहुतांश पत्रकार विसरतात. बातमीत बातमी असावी, मी नसावा एवढेच लक्षात घेतले जाते. झालेली घटना किंवा मुलाखत वा पत्रकार परिषद, सभा- संमेलनं यांची बातमी देणं हीच पत्रकारिता असा बहुतांश पत्रकार व बातमीदारांचा समज आहे.

पत्रकार व पोस्टमन यातला फरक ओळखता आला पाहिजे. पोस्टमन जसा आलेले पत्र पोहच करतो तसेच जर आपण प्रेस नोट किंवा बातमी आपल्या वृत्तपत्रात पाठवली तर वेगळेपण कसे जाणवणार. आज एक राईटर बातमी टाईप करतो व बाकीचे ती आपापल्या दैनिकांत साप्ताहिकात पोर्टलवर कॉपी पेस्ट करतात. एकच टिपणी व मथळा, एकच मजकूर अनेक दैनिकांत साप्ताहिकात पोर्टलवर एकाच वेळी प्रकाशित होतो.

एकच व्यक्ती अनेक दैनिकांचे, साप्ताहिकांचे व न्युज पोर्टल युट्युब चॅनलचे प्रतिनिधित्व करते. आधिच्या वेळी एका चॅनलवर साप्ताहिकात, दैनिकात काम करत असलेल्या पत्रकारास दुस-या दैनिकात, साप्ताहिकात स्थान नसायचे. किंवा त्याला आधीच्या दैनिकाचा, साप्ताहिकाचा राजिनामा तरी द्यावा लागत असे. प्रत्येक दैनिकात एकच घटना वा बातमीचा मथळा व मजकूर वेग वेगळा असायचा.

म्हणूनच प्रत्येक पत्रकाराचा वेगवेळा स्वतंत्र ठसा उमटायचा. आता सर्व बातम्या एकसारख्या असतात. आणि त्यावेळी एका दैनिकात छापून आलेली बातमी दुस-या दैनिकात दुस-या दिवशी छापण्याचे टाळले जात असे. अनेकांनी दैनिकांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यावेळी संपादकांचा एक आग्रह असे की दर आठवड्याला एक वार्तापत्र हवे. हे वार्तापत्र म्हणजे त्या आठवड्यातील महत्वपूर्ण घटनेचे विश्लेषण करणारे, त्या पत्रकाराचे वैशिष्ट्यपूर्ण वार्तांकन, त्यात वैशिष्ट्यपूर्ण माहिती असायची एक प्रकारचे संपादकीय.

आणि आठवड्यातील एक दिवस लेखनासाठी स्टोरी साठी राखीव ठेवला जात असे. या शिवाय स्वतंत्र लेख असे. सामाजीक, राजकीय, सर्वच क्षेत्रातील व्यक्ती आता माञ बोगस पञकारांमुळे वैतागुन स्वताः सोशल मिडियावर लिखान करुन वायरल करु लागलेत.

आजच्या लेखाचा मुळ उद्देश बातमी चोर... बोगस पत्रकारांचा सुळसुळाट आणि पत्रकारीता!

मुळात पत्रकार नसताना व पत्रकारितेचा गंध नसलेले अनेक झोळी छाप लोक पत्रकारितेत हैदोस घालत आहेत. एखाद्या दैनिक वा साप्ताहिकाचे व चॅनलचे ओळखपत्र मिळवायचे व लोकांना ब्लॅकमेल करून लूटमार करीत रहायचे हा धंदा सुरू झाला आहे. एखादा बकरा पकडायचा व सुरू होयाचे असले कारणामे बाहेर चर्चेत आहेत, पत्रकारांचे कार्ड, ओळखपत्र दाखवुन पैश्यांची मागणी करतात. त्यांची मागणी पूर्ण नाही झाली तर तक्रार करून ञास देऊन. गुन्हेगार असल्यासारखे टोळकी करुन दहशत पसरवतात.

असे बोगस पञकारांचे शिक्षण हि चौथी ते दहावी पर्यंत आहे. बोगस पञकार हे स्वताच्या स्वार्थासाठी व दहशत करण्यासाठी स्वयंम घोषीत पञकार झाले आहेत. अनेक जिल्हास्तरीय दैनिकांचे व साप्ताहिकांचे संपादक ब-याच वेळा पैसे घेऊन त्यांच्या चॅनलचे व वृत्तपत्रा वार्ताहर नेमतात व त्यांना पत्रकाराचे ओळखपत्र देतात. काही संपादक तर नियमित जाहिरात देणाऱ्यांना किंवा व्यापा-यांस, केदारास ओळखपत्र देतात. अर्थात या ओळखपत्राचा उपयोग बातमी देण्यासाठी कधीच होत नाही. आपल्या वाहनांवर प्रेसचे स्टिकर वा बोर्ड लावुन फिरायचे. त्यामुळे टोल, जकात चुकविता येते. अवैध मार्गाने माल आणला जातो. नाकाबंदीच्या काळात प्रेस असल्याने सखोल चौकशी व तपासणी पासून बचाव होतो तर ठेका मिळवण्यासाठी किंवा दबाव टाकुन विविध मार्गाने पैसे उकळण्यासाठी होतो.

वर सांगितल्या प्रमाणे हप्ते, खंडणी व ब्लॅक मेलिंगसाठी या ओळख पत्रांचा हमखास वापर केला जातो. काही बोगस पञकार दहशत करुन फसवणुक करुन मोठमोठे ठेके चालवत आहेत. आधिकारी पण वाद नको किंवा कुठे अडकायला नको म्हणुन का देतात. अशा भामट्या व बोगस पत्रकारांमुळे खरे पत्रकार बदनाम होतात व त्यांनाही त्याच नजरेने पाहिले जाते.

या बोगस पत्रकारांचे जनक खरे पत्रकारच असतात जे मोठ्या दैनिकांत काम करतात, हे खेदाने नमुद करावे लागत आहे. कारण कोणत्याही संपादकाने त्यांना ओळखपत्र दिलेच नाही तर या बांडगुळांना संधी मिळणार नाही. पण जाहिरात व एक रक्कमी पैश्याच्या मोहाला बळी पडून नोंदणीकृत वृत्तपञाचे संपादकच त्यांना ओळखपत्र बहाल करीत असतात.

जिल्हा माहिती कार्यालयाने ही वृत्तपत्र व चॅनलवर काम करणाऱ्यांची यादी, त्यांचे संपादक व अधिकृत प्रतिनिधी यांची यादी जाहिर केली पाहिजे व ती पोलीस स्टेशन, महापालिका, नगरपालिका व शासकिय कार्यालयात व शासकीय पोर्टलवर प्रसिद्ध केली पाहिजे.

पत्रकारांनीही याकामी पुढाकार घेऊन हे नासलेले कांदे फेकून द्यावेत व पत्रकारितेस बदनाम करणा-यांना आपल्यातून हुसकाऊन लावावे. शासनाने लॉकडाऊन काळात पत्रकारांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश केलेला आहे.

याच सवलतीचा गैरफायदा घेऊन ठेकदार, सामाजीक, राजकीय लोकांनी व गुन्हेगारी वृत्तीच्या बोगस व अनाधिकृत संपादकांनी बंद पडलेल्या वृत्तपत्रांच्या ओळखपत्रांची पुढाऱ्यांना सामाजीक कार्यकर्त्यांना तसेच अवैध धंदेवाल्यांना व्यापाऱ्यांना दुकानदारांना सर्रास विक्री केली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक स्वताच वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग करत आहेत शहरात खूप पत्रकार झाले आहेत गावात खूप पत्रकार झाले आहेत.

शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात खूप पत्रकार झाले आहेत नक्की कुणाकुणाला बोलवायचं असे अनेक प्रश्न सामाजिक राजकीय नेते विचारत आहेत अचानक एवढे पत्रकार आले कुठून असाही प्रश्न निर्माण होतो मात्र पत्रकारांची छबी याच्यात कुठेतरी बदनाम होत आहे.

याची खबरदारी सर्व पत्रकारांनी मोठमोठ्या दैनिक, साप्ताहिक व टीव्ही चॅनल्स वाल्यांनी खबरदारी घेतली पाहिजे राजकीय, सामाजिक नेत्यांनीही पत्रकारांना बोलवताना त्या पत्रकाराची माहिती घेतली पाहिजे अन्यथा सोशल मीडिया वरती पडणाऱ्या पोस्ट ह्या त्यांच्या अडचणीत भर पाडणार नक्की. पञकार हा टिकला पाहिजे जगला पाहिजे ह्या बातमी चोर… बोगस पञकारांवर करडी नजर ठेवुन यांना बाहेर काढले पाहिजे.

प्रकाश अशोकराव महिपाळे

नांदेड- 8806788575.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker