किनाळा येथे लग्नाला जाणाऱ्या वराडाचा टेम्पो उलटून तेविसजन गंभीर जखमी

मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड- देगलूर राज्य महामार्गावर किनाळा तालुका बिलोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या जवळ वैजापूर पारडी तालुका मुदखेड येथुन देगलूर तालुक्यातील शहापूर येथे लग्नासाठी जाणारा टेम्पो उलटून झालेल्या अपघातात वधूच्या बहिणीसह 25 जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 5 मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

सविस्तर माहिती अशी की मुदखेड तालुक्यातील वैजापूर पारडी येथील मारोती विठ्ठलराव मंगलआरपे यांच्या मुलीचा शहापूर तालुका देगलूर येथील सोपानराव मारुती कमलेकर यांच्या मुला समवेत 5 मे रोजी सकाळी बारा वाजता शहापूर तालुका देगलूर येथे विवाह आयोजित करण्यात आला होता.
शहापूर येथील या विवाह सोहळ्यासाठी वैजापूर पारडी येथून वधू कडील वराडी मंडळी एम.एच.26 एडी 6572 या टेम्पोमध्ये कपाट, गादी पलंग, रॅक, फ्रीज, कुलर आणि वधूला भेट म्हणून देण्यासाठी घेतलेली भांडीकुंडी टेम्पोमध्ये घेऊन जात असताना हा टेम्पो नांदेड देगलूर राज्य महामार्गावर किनाळा जवळ आला असता येथील उतारावर जिल्हा परिषद शाळेच्या जवळ रोडच्या मधोमध पलटी झाला.
हाच टेम्पो रोडच्या थोडेही खाली गेले असता तर वीस फूट खोल असलेल्या खड्ड्यात कोसळून मोठा अनर्थ घडला असता किंवा पाठीमागून याच वेळी कोणते वाहन आले असते तरी देखी आहे अऔपल रोडवर आणि रोडच्या कडेने पडलेल्या वराडींना याचा मोठा धक्का बसला असता परंतु वेळ आली होती पण काळ आला नव्हता याप्रमाणे हा मोठा अपघात झाला परंतु या अपघातात कोणाचीही जीवित हानी झाली नसुन वधूच्या बहिणीसह 23 जण गंभीर झाले.
हा अपघात झाल्याचे समजतात किनाळा येथील विलास पांचाळ, नागेश मोहिते, होसाजी उगे, माधव वाघमारे यासह अनेकांनी जखमींना तात्काळ एका आयचर टेम्पोत टाकून नायगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता येथील रुग्णालयात सर्व जखमेवर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात पाठवून दिले.
या अपघातात सुदैवाने कोणाचीही जीवित हानी झाली नाही मात्र काही हौशी शौकीनानी या अपघातात पाच जण ठार झाल्याचे वृत्त व्हाट्सअप व फेसबुक वर टाकल्याने शहापूर येथील वराकडील मंडळी व वैजापूर पारडी येथील वधूच्या घराकडील सर्व नातेवाईकांना या चुकीच्या पोस्टचा मानसिक धक्का बसला असून नियोजित वधू-वरांचा शहापूर येथे या दुःखद प्रसंगाला सावरत विवाह सोहळा संपन्न करण्यात आला.
हा अपघात झाल्याचे समजतात किनाळा व परिसरातील नागरिक घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केले यावेळी शेकडो नागरिक रस्त्यावर आल्याने वाहतूक सेवा विस्कळीत होत होती परंतु अनेकांनी वाहतूक विस्कळीत न होऊ देता जखमींना काढून देण्यासाठी रस्ता मोकळा केले यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जांभळीकर व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
बातमी प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद साहेब महत्वाचे बातमी पाठवतो आणि आम्हाला सकाळी आपली नवी भारत न्युज एक दम छान व बिलोली तालुका प्रतिनिधी आहे का