ताज्या बातम्यानांदेडबिलोली

गंजगावच्या खाजगी क्षेत्रातून रात्रीला नियमबाह्य वाळूची वाहतूक : माफीयांना महसूल विभाग व पोलीस यंत्रणेचे भक्कम पाठबळ

अंकुशकुमार देगावकर

बिलोली : शासनाच्या नियमानुसार दि. १० जुन ते ३० सप्टेंबर दरम्यान वाळू उपसा करण्यास मनाई आहे. परंतु नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाचा नियम खुंटीवर अडकून ठेवत बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील गट क्रमांक ३२५ मधील खाजगी क्षेत्रातून वाळू काढण्यासाठी चक्क दि. १६ जुन ला परवानगी दिली आहे. पण या गटातून रात्रीला नियमबाह्य वाळू काढण्यात येत असल्याने. या गैरप्रकाराला महसूल विभाग व पोलीस यंत्रणा पाठबळ देत आहेत. पैसा किती पावरफूल असू शकतो याचा प्रत्यय बिलोलीकरांना येत आहे.

शासकीय वाळू घाटाला जे नियम लागू आहेत तेच नियम खाजगी क्षेत्रातून वाळू निष्कासित करण्यासाठी लागू आहेत. कुठल्याही क्षेत्रातून वाळू उपसा करण्यास दि. १० जुन ते ३० सप्टेंबर पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. बिलोली तालुक्यातील यापुर्वी ज्यांना ज्यांना परवानगी दिली त्यांच्या आदेशात वरील नियम स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. पण अर्थिक ओझ्याखाली दबून महसूलचे अधिकारी काहीही निर्माण घेत आहेत.

बिलोली तालुक्यातील गंजगाव येथील सागरबाई बाजीराव पाटील यांच्या मालकी गट क्रमांक ३२५ मधून १५१० ब्रास वाळू निष्कासित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दि. १६ जुन रोजी परवानगी दिली. सदरची परवानगी पुढील २० दिवसासाठी म्हणजे ५ जुलै २०२५ पर्यंत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाने केलेला नियम खुंटीवर अडकवून ठेवला असल्याचे उघड उघड दिसून येत आहे.

गंजगाव येथील सागरबाई बाजीराव पाटील यांच्या मालकी गट क्रमांक ३२५ मधून १५१० ब्रास वाळू निष्कासित करुन जमीन लागवड योग्य करणे हा उद्देश आहे पण नियमानुसार सदरची परवानगी पावसाळ्याच्या आगोदरच दिली पाहिजे होती. कारण उन्हाळ्यात परवानगी दिली असती तर वाळू निष्कासित करुन हे शेतकरी जमीन लागवडी योग्य केले असते परंतु पावसाळ्यात परवानगी दिल्याने जमीन लागवडी योग्य करता येणार नाही. हे माहीत असतांनाही जिल्हाधिकारी कार्यालय पावसाळ्यात परवानगी देवून काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.

बिलोली तालुक्यातील ज्या पाच ते सहा खाजगी गटातील क्षेत्रातून ‘लाल’ वाळू निष्कासित करण्याच्या परवानगीसाठी प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या करामती, उचापती आणि बोगसगिरी पाहता यातून या यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी ‘लाल’ झालेले दिसून आले असतानाच गंजगाव येथील गट क्रं. ३२५ मधील वाळू निष्कासित करण्याची परवानगी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंतच असताना रात्रभर नियमबाह्य वाळू वाहतूक होत आहे. नियमबाह्य वाळू उपसा करुन रात्रीला वाहतूक करणाऱ्या वाहणावर कारवाई करण्याऐवजी महसूल विभाग व पोलीस यंत्रणा पाठबळ देण्याचे काम करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker