रवींद्र चव्हाण हेच लोकसभा निवडणूक लढणार : के.सी. वेणूगोपाल यांनी जाहीर केली उमेदवारी

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : विधानसभा आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्रच होणार असल्याने मतदारांच्या मनातील संभ्रम दुर झाल्यानंतर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के.सी वेणूगोपाल यांनी गुरुवारी एक प्रसिद्धी पत्रक काढून दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
चार महिण्यापुर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव काँग्रेस सोडून भाजपात गेल्यानंतर काँग्रेसचे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असतानाच वसंतराव चव्हाण यांनी शिवधनुष्य उचलून दंड थोपटले लोकसभा निवडणूक जिंकली. त्यामुळे पुर्ण महाराष्ट्रात एक वेगळाच संदेश गेला. पण त्यांचा काळ अल्प ठरला आणि काळाने घाला घातल्याने ते आज आपल्यात नाहीत. मात्र वसंतराव चव्हाण हे जरी आपल्यात नसले तरी आम्ही चव्हाण परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश काँग्रेस व राहूल गांधी यांनी दिला.
त्याचबरोबर प्रत्यक्ष चव्हाण कुंटूंबीयांची भेट घेवून काळजी करु नका मी तुमच्या सोबत आहे असा स्पष्ट संदेश दिला होता. पडत्या काळात दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांनी काँग्रेसला सावरण्यासाठी जे परिश्रम घेतले त्याची जाणीव काँग्रेस नेतृत्वाला असली तरी सतेत असलेले सरकार हे विधानसभेबरोबरच लोकसभेची पोट निवडणूक घेते की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु निवडणूक आयोगाने पोट निवडणूक जाहीर केली त्याचवेळी दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांचे सुपूत्र हेच उमेदवार असणार हे निश्चित होते.
या निश्चितेवर दि. 17 रोजी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणूगोपाल यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार हे रवींद्र वसंतराव चव्हाण हेच असतील असे जाहीर केले आहे. खा.वेणूगोपाल यांच्या प्रसिद्धी पत्रकामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला असून जिल्ह्यातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
विजयी भव……