शंकरनगर येथील विविध शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

मोरे मनोहर
किनाळा :- शंकरनगर परिसरातील गोदावरी मनार पब्लिक स्कूल, श्री साईबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल, शिवनेरी पोतदार पोतदार ई लर्निंग स्कूल व रामतीर्थ किनाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
शंकरनगर तालुका बिलोली येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूल व ज्यु. कॉलेजच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेतील शिक्षकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत येनार्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्याचे मनोबल वाढावे तो शाळेविषयी त्याची त्याच्या मनामध्ये असलेली भीती नाहीसी व्हावी शाळेविषयी आपुलकी निर्माण व्हावी, व तो शाळेत येण्यासाठी कसा आकर्षित होईल हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रचार्यांच्या हस्ते चॉकलेट पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व प्रत्येक विद्यार्थी तितक्याच आत्मयीतेने येऊन चॉकलेट व पुष्पगुच्छ स्वीकारत होते.
शाळेतील प्राचार्यांनी विद्यार्थी शाळेकडे आकर्षित कसा होईल या धर्तीवर शिक्षणाचे धडे दिले पाहिजे व ती काळाची गरज आहे विद्यार्थी व शिक्षक यांचे संबंध आपुलकीचे असणं गरजेचं आहे तेंव्हा शाळेप्रती त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण होईल व तो शाळेकडे आकर्षित होईल यासाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे अनमोल मार्गदर्शन केले.