चावडी चावडीवर एकच चर्चा… “साहेब” जेलमध्ये जायचे होते पण… भाजपमध्ये जायला नको होते
मोरे मनोहर
किनाळा :- नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गावागावात चावडी चावडीवर या निवडणुकीत कोण विजयी होणार या चर्चा रंगत असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांना भाजपकडून ईडीची धमकी देऊन भाजपात येण्यास भाग पाडले असतील किंवा राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचे आश्वासन दिले असतील परंतु साहेबांनी काँग्रेस पक्ष सोडायला नको होते वेळ आलीच तर एक बार साहेब जेल मध्ये जायचे होते परंतु भाजपात जायला नको होते अशा चावडी चावडीवर मतदारातून चर्चा ऐकावयास मिळत आहेत.
काँग्रेस पक्षाकडून कै.शंकररावजी चव्हाण साहेब हे 1948 पासून काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस पदापासून ते राजाचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा अनेक पदांवर राहुन 2004 पर्यंत पक्षासाठी एकनिष्ठपणे कार्य केले याचबरोबर अशोकरावजी चव्हाण साहेब हे देखील काँग्रेस टंखखपक्षात 2008 पासून आमदार पदापासून ते राज्याचे मुख्यमंत्री पदापर्यंत गेले असताना यांच्या हातून शेकडो नेते व कार्यकर्ते घडले त्यामुळे अशोकरावजी चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला असल्याने काँग्रेस पक्षाने देखील राज्याची जबाबदारी अशोकरावजी चव्हाण यांच्यावरच सोपवलेली असताना ऐन वेळी अशोकरावजी चव्हाण साहेब काँग्रेस पक्षाला अखेरचा रामराम ठोकून भाजपात गेल्याने त्यांनी घेतलेला हा निर्णय अनेक कार्यकर्त्यांच्या जीवारी लागला असल्याने काही जण साहेबांसोबत गेले मात्र काही जण साहेबांसोबत न जाताच काँग्रेसमध्येच राहणे पसंत केले.
अशोकरावजी चव्हाण साहेबांचे विश्वासू व निष्ठावंत नेते व कार्यकर्ते म्हणून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण, मुखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, स्वच्छता दुत माधवराव पाटील शेळगावकर, बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेशभाऊ अंतापुरकर यासह नांदेड जिल्हा परिषदेचे मा.सभापती संजय आप्पा बेळगे, माजी सभापती सय्यद रहिम, संभाजी पाटील भिलवंडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय पा शेळगावकर, गिरीधर पाटील डाकोरे, शिवाजी पा पाचपिपळीकर, मोहनराव पा धुप्पेकर, गणपतराव पा धुप्पेकर, बालाजी नाईक, जयवंतराव गायकवाड हे आज पर्यंत अशोकराव चव्हाण साहेब सांगतील ते ऐकणारे मात्र साहेबांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयानंतर मात्र हेच नेते व कार्यकर्ते मात्र साहेबांच्याच विरोधात दंड थोपटून काँग्रेस पक्षातच राहुन पक्षाच्या प्रचारात उतरले असल्याचे दिसून येत आहे.
अशोकरावजी चव्हाण भाजपाचा कितीही तन-मन-धनाने प्रचार केले तरीदेखील भाजप येणाऱ्या या निवडणुकीत हरली तर अशोकराव चव्हाण मुळेच घात झाला आणि जर निवडून आले तर मात्र आम्ही चव्हाण साहेबांमुळे नव्हे तर पक्षाच्या बळावर निवडून आलोत हे भाजप कार्यकर्त्यांच्या तोंडून आपसूकच शब्द ऐकायला मिळतील असे बोलले जात असल्याने अशोकराव चव्हाण आणि यांच्याबरोबर माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर हे देखील भाजपच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करत असले तरी भाजपाचे उमेदवार पराभूत झाल्यास त्यांच्या पराभवाचे खापर मात्र यांच्या नावाने फुटणार असे चित्र दिसून येत आहे.