ताज्या बातम्यानांदेडबिलोली

विद्युतचा शॉक लागलेल्या गणेश डुबुकवाडची आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज अखेर अपयशी…

धुप्पा वीज कार्यालयात पार्थिव देह ठेवला… रामतीर्थ ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे त्यांच्या आश्वासनानंतर शोकाकुल वातावरणात गणेश डुबुकवाड यांचा शंकरनगर येथे अंत्यसंस्कार

मोरे मनोहर

किनाळा :- विद्युत मंडळाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत मंडळाच्या सब स्टेशनला वीज पुरवठा होणाऱ्या खांबावरील लावलेले इन्सुलेटर पिन तुटल्याने विजेचा तार शंकरनगर जवळ धुप्पा शिवारातील गट क्रमांक 71 मध्ये रामदास जिल्हेवाढ यांच्या शेताजवळ संत ज्ञानेश्वर विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही विजेची तार लोमकळत असताना शंकरनगर येथील पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या एका तरुणास दि.20 जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास विजेच्या या मुख्य विजवाहींच्या ताराचा शॉक लागून जळाल्याने गणेश कोंडीबा डुबुकवाड हा तरुण गेल्या आठ दिवसापासून नांदेड येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता.

मात्र त्यांचे हे झुंज अखेर अपयशी ठरली असून त्यांचा दिनांक 28 जून रोजी पहाटे नांदेड येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला असल्याने त्यांचा पार्थिव देह शंकर नगर झोपा येथील 132 केवी महावितरण कार्यालयात आणून ठेवुन मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी एक मोठी मागणी केली असता रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी मनुष्यबदाचा अपघात दाखल करण्यात येईल अशी आश्वासन दिल्यानंतर गणेश यांचा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की शंकरनगर येथील गणेश कोंडीबा डुबुकवाड वय वर्ष 22 हा तरुण नेहमीप्रमाणे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी गेला असताना तो सराव करून घराकडे परत येत असताना धुप्पा येथील 132 उपकेंद्रातुंन बामणी येथे असलेल्या 33 केवी केंद्रास वीज पुरवठा करणाऱ्या शंकरनगर जवळील या विजेच्या खांबावरील ताराची इन्सुलेटर पिन तुटून शंकरनगर जवळ शाळेकडे जाणाऱ्या पायवाट असलेल्या रस्त्यावर सुमारे 12 तासापासून लोमकळत असताना याकडे विद्युत मंडळाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. यामुळे या पायवाटेने नेहमीप्रमाणे येणाऱ्या गणेश डुबुकवाड यांना रस्त्यात लोमकळत असणारी विजेची हि तार न दिसल्याने त्यांना या तारेचा धक्का लागल्याने यात गणेश हा शॉक लागून मोठ्या प्रमाणात जळाला होता.

गणेश डुबुकवाड यांना विजेचा शॉक लागून तो जळाल्याचे समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर भाजलेल्या गणेश डुबुकवाड यांना तात्काळ उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र आठ दिवसापासून मृत्यूची झुंज देणाऱ्या गणेश डुबुकवाड यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक दानशूर नागरिकांनी मदतीचा हात देऊन गणेश यांचे प्राण वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न अनेकांनी केले.

मात्र त्यांच्या या आर्थिक परिस्थितीकडे विद्युत मंडळाकडून किंवा कोणत्याही राजकीय नेत्याकडून कसलीही आर्थिक मदत न मिळाल्याने देगलूर बिलोली विधानसभेचे विद्येमान आमदार जितेश अंतापुरकर यांनी सदरील तरुणास योग्य ती मदत करण्यात यावी अशी मागणी नांदेड येथे झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत केले होते परंतु डुबुकवाडी यांच्या कुटुंबीयांना कसलेही अर्थसहाय्य न झाल्याने गणेश डुबुकवाड यांचा अखेर उपचारादरम्यान नांदेड येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

कोंडीबा डुबुकवाड यांचा एकुलता एक असलेला गणेश डुबुकवाड हा मुलगा पोलीस भरतीसाठी सराव करणारा तरुण युवक वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप तरुणाचा बळी गेला असल्याने हीच वितरण कंपनीच्या विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केल्या जात असून वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात 22 जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून वीज वितरण कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र बेजबाबदार असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करून डुबुकवाड कुटुंबीयांना तात्काळ आथिर्क मदत ध्यावे.

असी मागणी सामान्य नागरीकानी करत गणेश डुबुकवाड यांचा पार्थिव देह शंकरनगर ( धुप्पा) येथील 132 केवी महावितरण कार्यालयात ठेउन महावितरण च्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली असता रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांनी उपस्थित नागरिकांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर सदरील गणेशचा पार्थिव देह त्यांच्या घरी नेण्यात आला.

शंकरनगर येथे दुपारी अडीच वाजता गणेश यांचा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी भोई समाजाचे जिल्हा अध्यक्ष व रामतीर्थ पोलीस स्टेशनचे बीट जमादार जांभळीकर यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करताना गणेश डुबुकवाड यांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे सांगून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker