ज्येष्ठ बौध्द साहित्यिक डी.एल. कांबळे लिखित धम्मग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न

आशा रणखांबे
कल्याण : धम्मसूर्य प्रकाशन, कल्याण आयोजित ज्येष्ठ बौध्द साहित्यिक डी.एल. कांबळे लिखित तथागतांचा धम्म आणि विज्ञान (आवृत्ती चौथी) आणि बोधिसत्वाच्या जातक अट्ठकथा खंड ३ (आवृत्ती दुसरी) धम्मग्रंथ प्रकाशन सोहळा एन एस भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली धम्मदीप बुध्दविहार, राजभर नगर, चिंचपाडा रोड, कल्याण (पूर्व) येथे नुकताच उत्साहात संपन्न झाला.
यावेळी आशीर्वाद देण्यासाठी भंते संघपाल (श्रमण शिक्षा अभियान) उपस्थिती होते. तर प्रमुख पाहुणे राजाराम पाटील (विचारवंत), प्रा. विजय मोहिते (पालीभाषा व इतिहासाचे अध्यापक), प्रा. डॉ. अनुप्रिया खोब्रागडे (नाट्य कलावंत), प्रा. संघमित्रा जाधव (पाली शिक्षिका) होते. प्रमुख मान्यवर आणि अध्यक्षांनी प्रकाशित होत असणाऱ्या दोन ग्रंथावर आपले भाष्य करून आपली मोलाची मते मांडली.
प्रास्ताविक प्रा. युवराज मेश्राम, सुत्र संचालन साहित्यिक नवनाथ रणखांबे तर या सोहळ्याचे आभार अनिल बसवंत यांनी केले. यावेळी साहित्य, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थिती होते. चंद्रशेखर भारतीय, शाम भालेराव , धम्मकिरण चन्ने, ग्रीष्मा खोब्रागडे, जगदेव भटू, शुक्राचार्य गायकवाड, शिवा इंगोले आदी. साहित्यिक उपस्थित होते.
धम्मग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे प्रकाशन करताना प्रमुख मान्यवर एन. एस. भालेराव, राजाराम पाटील, ग्रंथाचे लेखक डी. एल. कांबळे, प्रा. विजय मोहिते, प्रा. डाॅ. अनुप्रिया खोब्रागडे, साहित्यक नवनाथ रणखांबे, प्रा. युवराज मेश्राम आणि अनिल बसवंत.



