शेळगाव (थडी) जवळील गोदावरी नदीत आत्महत्या करण्यास गेलेल्या महिलेचे वाचवले प्राण ; कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे स.पो.नि ज्ञानेश्वर शिंदे यांची कौतुकास्पद कामगिरी !
◆पोलीसांच्या समुपदेशाने महिला आमहत्येपासून दूर

कुंडलवाडी :- तालुक्यातील अर्जापुर गावातील एका ४५ वर्षीय महिला शेळगाव (थडी) जवळील गोदावरी नदीवरून उडी मारून आत्महत्या करण्यास गेली असताना तिस कुंडलवाडी पोलीसांनी वाचविल्याची घटना दि.२७ सप्टेंबर रोजी सहा वाजता घडली आहे. कुंडलवाडी पोलीसांनी कौतुकास्पद कामगिरी केली असुन संबधीत महिलेची समजुत घालून त्यांना कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे.
कुंडलवाडी पासून जवळच असलेल्या अर्जापुर गावातील पंचशीला लालू कांबळे (४५ वर्ष) हि महिला आपल्या २ मुली व एक मुला सोबत राहते.नवरा मयत आहे. दि.२७ सप्टेंबर रोजी कौटुंबिक वादातून महिला शेळगाव(थडी) जवळील गोदावरी नदीवरून उडी मारून जीव देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तेथून जात असलेल्या लोकांनी नदीच्या पुलावर महिला दिसल्याने महिलेकडे विचारपूस केली.
महिलेने मला जगायच नाही. मला आत्महत्या करायची आहे. असे उत्तर दिल्याने काही लोकांनी हि बाब कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांना दिली. तात्काळ शेळगाव(थडी ) येथे जात महिलेस आत्महत्या करण्यापासून वाचवून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात आणले. तिथे महिलीचे आई यांना बोलावून घेतले.
व महिलेची समजुत काढले व सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व महिला पोलीस कर्मचारी अरूणा श्रीवास्तव यांनी महिलेचे समुपदेशन करून महिलेस तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. कुंडलवाडी पोलीसांनी आत्महत्या करण्यास निघालेल्या महिलेचा जीव वाघविले. कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.




बातमी
दगडापुर