सहा तास पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यास सुखरूप बाहेर काढले… पळशी येथील घटना

बालासाहेब शिंदे
मारतळा :- गेल्या 24 तासापासून धुवाधार बरसणाऱ्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. त्या पाण्याने जमिनीतील पिके नामशेष झाली असल्याचे चित्र दिसत आहे. दिनांक 28 रोजी पळशी येथील शेतकरी आनंदा रामचंद्र कोल्हे वय साठ वर्षे हे पळशी शिवारातील आपल्या आखाड्यावर पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान गुरांना वैरण टाकण्यासाठी गेले असता भेंडेगाव नदी ला अचानकपुर आल्याने पाहता पाहता त्या पुराचे पाण्याने त्यांच्या आखाड्याला वेळच घातला पाण्याची प्रवाह जास्त आल्याने जवळपास पंधरा फुटाच्या वर पाणी झाले.
त्यांनी ही परिस्थिती पाहून आपल्या शेतातील लिंबाच्या टोकावर चढले व आरडा ओरड केल्याने गावकऱ्यासह सरपंच नामदेव कोल्हे व पोलीस पाटील श्रीकांत कोल्हे यांनी ही परिस्थिती पाहून क्षणाचा विलंब न लावता प्रथम नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर व नामदार हेमंत पाटील सह तहसीलदार विठ्ठल परळीकर, ग्राम महसूल अधिकारी बोधगिरे, राजू इंगळे, ग्रामसेवक, व बीट जमादार गीते यांना याबाबतची माहिती कळविली.
व लागलीच आमदार बोंढारकर व हेमंत पाटील यांनी लागलीच जीव रक्षक दलाच्या तुकडीस पाचारण केले, व त्यांना मदतीस मराठा क्रांतिवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष लखन मोरे व त्यांच्या सहकार्याने जीवाची परवा न करता मरणाच्या दाढेत अडकलेल्या आनंदा कोले यांना सुखरूप बाहेर काढले.



