गावाकडच्या बातम्यानांदेडनायगांव

नायगावच्या बाजारपेठेत ‘करटूले भाजीची धूम ; २० गुंठ्यांतून दीड लाखांच्या उत्पन्नाची आशा

तानाजी शेळगावकर

नायगाव :- नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात दर गुरुवारी भरणाऱ्या साप्ताहिक बाजारात सध्या आरोग्यदायी वनस्पती भाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करटुले भाजीची मोठी चर्चा रंगली आहे. इज्जतगाव, साधकपूर येथील प्रगतशील शेतकरी निरंजन परशराम डोईफोडे यांनी २० गुंठे क्षेत्रात सुमारे ५५ हजार रुपये खर्च करून कळटुलेची लागवड केली आहे.

सध्या नायगावच्या साप्ताहिक बाजारात करटुलेची विक्री प्रति पाव ५० रुपये दराने होत असून ग्राहकांकडून या भाजीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या लागवडीतून सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी निरंजन डोईफोडे यांनी सांगितले.

आरोग्यासाठी उपयुक्त गुणधर्म असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये करटुले भाजीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या पिकाकडे अनेक शेतकरीही आकर्षित होत असून नायगाव तालुक्यात करटुले शेती हा चर्चेचा आणि प्रेरणेचा विषय ठरला आहे.

कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळवून दिल्याबद्दल शेतकरी निरंजन परशराम डोईफोडे यांचे परिसरातील नागरिक व शेतकरी कौतुक करत आहेत. त्यांच्या या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांनाही पारंपरिक पिकांबरोबरच आरोग्यदायी व मूल्यवर्धित पिकांच्या लागवडीसाठी प्रेरणा मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker