ताज्या बातम्यानांदेडनायगांव

शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टतर्फे निराधार मुलांना मदतनिधी

नायगाव : आई-वडील नसणाऱ्या अनाथ, निराधार तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने मदतनिधी नांदेड जिल्ह्यातील ‘आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना’ दिवाळी निमित्त ‘घरपोच मदत’ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सोहळा शुक्रवार (दि. ०६) रोजी सकाळी अकरा वाजता नरसी आनंदीसदन (राज पॅलेस) नांदेड रोड,नरसी ता.नायगाव जि.नांदेड येथे पार पडणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी व कार्यक्रमाचे आयोजक शेतकरी पुत्र गजानन पाटील होटाळकर यांनी आयोजन केले आहे.

केवळ शिक्षणच नव्हे तर मायेचा आधार देणार…
नांदेड जिल्ह्यातील अनाथ मुलांना केवळ शिक्षणच नव्हे, तर त्यांच्या आयुष्यात मायेचा आधार देण्याच्या भावनेने हे कार्य अविरत सुरू असल्याचे प्रा. गोसावी सर यांनी स्पष्ट केले. अनाथ आणि गरजू मुलांना शालेय व आवश्यक साहित्य देऊन त्यांचे पालकत्व स्वीकारण्याच्या या उपक्रमाचे हे १३ वे वर्ष आहे. ट्रस्टने आतापर्यंत १२७ मुलांचे पालकत्व यशस्वीपणे स्वीकारले असल्याचे प्रा. गोसावी यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक श्री.शहाजी उमाप सर राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.राहुल कर्डिले, नांदेड पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तकुमार कळसाईत, उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली श्याम पानेगावकर, भास्कर पाटील भिलवंडे, उद्योजक मनोज पाटील मोरे, राजेश पाटील भिलवंडे, डॉ.शेख अनिस, डॉ.संतोष मोरे आदी उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!