ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

सुनेत्रावहिनी पवार यांच्यावरील वक्तव्याचा नांदेडमध्ये राष्ट्रवादीचा एल्गार ; काँग्रेस नेत्यांविरोधात जोरदार निदर्शने

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मा.ना. सौ. सुनेत्रावहिनी पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नांदेड शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले. आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर येथे झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत घोषणाबाजी केली.

महिला लोकप्रतिनिधींचा अवमान करणारी वक्तव्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र महिलांचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे. महिला नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भाषा आणि पातळी सांभाळावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, शिरीष देशमुख गोरठेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच कंधार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, उमरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, देगलूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, माजी जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षीताई कागडे, साहेबराव धनगे, मनपाचे नगरसेवक साबेर चाऊस, हबीब बावजीर, सुनील नानवटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम, बालाजी शिंदे, स्वप्निल इंगळे, मोहसिन खान पठाण, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुनंदाताई जोगदंड, शहर जिल्हाध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या आंदोलनातून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस नेत्यांना स्पष्ट संदेश देत “महिलांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांना रस्त्यावर उतरून उत्तर दिले जाईल” असा आक्रमक इशारा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker