ताज्या बातम्यानांदेडनायगांव

आ.बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध : प्रहारने नायगावमध्ये पुतळा जाळला

New Bharat Times नेटवर्क

नायगाव : तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदींनी सहा हजार दिले. तुझ्या बायकोला, मायच्या, बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरील कपडे आमच्या सरकारचे. तुझ्या पायातील बुट-चप्पल आमच्यामुळे, तुझ्या हातातील मोबाइलच डबडं आमच्यामुळे, आमचेच पैसे घेतो आणि आमच्यावरच तंगड्या वर करतो. अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या आ. बबनराव लोणीकर यांचा प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करुन। शनिवारी येथील हेडगेवार चौकात त्यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करुन पुतळा जाळण्यात आला.

दोन दिवसापूर्वी आ. बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्याबद्दल वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत असून आ. लोणीकरांच्या विरोधात प्रहार जनशक्ती संघटना रस्त्यावर उतरली आहे. शनिवारी दुपारी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते गजानन चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये व कार्यकर्त्यांनी लोणीकरांचा पुतळा रूमन्याला बांधून जोडेमारो आंदोलन केले व पुतळा जाळण्यात आला. यावेळी आ.लोणीकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नंतर तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यावेळी विठ्ठलराव देशमुख, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नादेड जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ हुडेकर, जनशक्ती पक्ष नादेड जिल्हा संपर्क प्रमुख गणेश हांडे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नादेड जिल्हा दक्षिण सचिव मारोती मंगरुळे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नादेड उत्तर सचिव शिवलिंग माटोरे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नादेड जिल्हा कार्याध्यक्ष गोपीनाथ मुंडे सांगवीकर, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नादेड जिल्हा संपर्क प्रमुख राजेश बेळगे, प्रहार जनशक्तीपक्ष बिलोली तालुका अध्यक्ष शंकर आचेवाड, शेतकरी पुत्र उमाकांत बादेवाड, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना मुदखेड माजी तालुका अध्यक्ष अनिल शेटे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अंगद मुदखेडे.

प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बिलोली तालुका अध्यक्ष हानमत सिताफुले, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नायगाव तालुका अध्यक्ष श्री साईनाथ बोईनवाड प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बिलोली महिला अध्यक्ष शांताबाई चितले , प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बिलोली तालुका सचिव श्री नागेश काळे प्रहार जनशक्तीपक्ष बिलोली तालुका उपाध्यक्ष श्री विनोद भाऊ हाचगुडे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नायगाव तालुका उपाध्यक्ष श्री माधव कोसबे, प्रहार सेवक श्री मैलाभई शेख प्रहार दिव्यांग क्रांती संघटना धर्माबाद तालुका अध्यक्ष साईनाथ साईनाथ इबितवार, विठ्ठल बोरीकर, मुजाहिद शेख, शंकर चव्हाण, जुन्निकर शेतकरी व प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker