गणेश डुबुकवाड कुटुंबीयांची भेट घेऊन डॉ.मिनल पाटील खतगावकर यांनी केले सांत्वन

मोरे मनोहर
किनाळा :- पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन पोलीस भरतीसाठी धावण्याचा व व्यायामाचा नियमित सराव करणाऱ्या शंकरनगर तालुका बिलोली येथील तरुण गणेश कोंडीबा डुबुकवाड वय वर्ष 22 या तरुणाचा विद्युत मंडळाच्या निष्काळजीपणामुळे खांबावरील लोंबकळत असलेल्या विजेच्या ताराचा दि. 20 जून रोजी शॉट लागून तो गंभीर जखमी झाल्याने त्यांचा नांदेड येथे उपचार सुरू असताना तो मृत्यूशी झुंज देत असताना अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरल्याने त्यांचा 28 जून रोजी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले हि दुःखद घटना समजताच दि.29 जून रोजी डुबुकवाड कुटुंबीयांची माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सौ.मीनलताई पाटील खतगावकर यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
एकुलता एक असलेल्या गणेश डुबुकवाड यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शासनाकडून जे काही आर्थिक मदत देता येईल यासाठी तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल असे सांगत कार्यकारी अभियंता देगलूर विद्युत वितरण व तहसीलदार बिलोली आणि सहायक पोलिस निरीक्षक रामतीर्थ यांना भ्रमणध्वणी द्वारे बोलून डुबुकवाड कुटुंबीयांना योग्य ती मदत करावे अशा सूचनाही केल्या.
यावेळी शेषराव पाटील, हनमंतराव पाटील तोडे, संतोष पुयड, सदाशिव पाटील डाकोरे, यादवराव भिलोडे, बाजीराव पाटील रोकडे, आनंदराव पाटील, राम पाटील, शिवाजी पाटील, हनमंत पंधरवाडे, मारुती पंधरवाडे, राजू डुबुकवाड, अमजद पठाण, सलमान पठाण, मोगलाजी डुबुकवाड आदीसह अनेक गावातील नागरिक उपस्थित होते.