एसबीआय बँकेच्या स्थापना दिनानिमित्त रामतीर्थ शाखेत 25 रक्तदात्यांनी केले रक्तदान

मोरे मनोहर
किनाळा :- भारतीय स्टेट बँक ऑफ शाखा रामतीर्थ यांच्या वतीने एसबीआय बँकेच्या 70 व्या स्थापना दिनानिमित्त दिनांक 17 जून रोजी सकाळी 9.30 ते 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते यावेळी येथील शाखेचे शाखा प्रबंधक अंकुश सुत्राळे यांच्यासह बँकेचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सुमारे 25 रक्तदात्यांनी रक्तदान करून हे शिबिर यशस्वी केले.
रामतीर्थ तालुका बिलोली येथील एसबीआय शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुहास मांडले व त्यांचे सहकारी आणि शंकरनगर परिसरातील बँकेचे ग्राहक हे बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी स्वयंपुरतीने येऊन आपले रक्तदान केले. याप्रसंगी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना एसबीआय शाखेच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.
रक्तदान हे श्रेष्ठदान असून एखाद्या गरजू रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी लागणारे रक्त हे कोणत्या कारखान्यात तयार होत नाही तर ते रक्त कोणीतरी व्यक्तीनेच कोणाचा जीव वाचवण्यासाठी द्यावे लागते म्हणून एसबीआय बँकेच्या 70 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने भारतीय स्टेट बँक शाखा रामतीर्थ येथील शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हा स्थापना दिनानिमित्त अतिशय स्तुत्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन शाखा प्रबंधक अंकुश सुत्राळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
बँकेच्या दैनंदिन कारभारात सामाजिक उपक्रम राबवले जात नाहीत मात्र भारतीय स्टेट बँक ऑफ शाखा रामतीर्थ यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजन करून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शाखेचे शाखा प्रबंधक अंकुश सुत्राळे, शाखेचे फिल्ड ऑफिसर सचिन आंबेराव, निलेश दमकोंडवार, गिरीराज जंगीलवार, निखिल खोब्रागडे, शेषराव हनमंते आधी सह अन्य शाखेचे कर्मचारी विशेष परिश्रम घेऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी केले.
रामतीर्थ येथील शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात रक्तदात्याचे रक्त संकलनासाठी नांदेड येथील जिजाई रक्तपेढीचे डॉ.सुरज पाटील व त्यांची टीम उपस्थित होती उपस्थित वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या टीमचे शाखाप्रबंधक अंकुश सुत्राळे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.