मोकली येथे घरपोडी ; १ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास

कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या धर्माबाद तालुक्यातील मोकली येथे घर घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्माबाद तालुक्यातील मोकली येथील शेतकरी शेषेराव विठ्ठलराव वारले व त्याची पत्नी लक्ष्मीबाई हे दि. २२ जुन रोजी दुपारी ०२.०० वाजताच्या सुमारास अहमदपुर येथे शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्तीस्थळ येथील मठामधील धार्मीक कार्यक्रमासाठी घराला व गेटला लॉक लावुन गेलो असता दि.२२ रोजीचे दुपारी ०२.०० वाजता ते दि. २३ रोजीचे सायंकाळी ०५.०० वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चारेट्याने घरी नसल्याचा फायदा घेत घराचा कोंडा कशानेतरी कट करुन घरामध्ये प्रवेश करुन कपाटाचे दार उघडुन साडयाखाली ठेवलेली चावीने कपाटातील लॉकर उघडुन ३० हजार रुपये नगदी, २१ हजार रुपयाची सोन्याची एकदानी, २१ हजार रुपयांचे सोन्याचे हातातील दंडकडे, २१ हजार रुपयांचे सोन्याचे कानातील दोन मकर कुंडले, १८ हजार रुपयांचे सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकुण १ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी दि.२४ जून रोजी अज्ञात चोरट्या विरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी धर्माबाद चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपत्ते, कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. चोरट्यांच्या तपासासाठी श्वान पथक व ठसे तज्ञांना प्राचारण करण्यात आले असून चोरट्यांचा पुढील तपास कुंडलवाडी पोलिसांकडून सुरू आहे.