ताज्या बातम्यानांदेडबिलोली

मंगळवारी एसबीआय बँकेच्या 70 व्या स्थापना दिनानिमित्त रामतीर्थ शाखेत रक्तदान शिबिर

मोरे मनोहर

किनाळा :- एसबीआय बँकेच्या 70 व्या स्थापना दिना निमित्त शंकरनगर (रामतीर्थ ) तालुका बिलोली येथे आज दिनांक 17 जून रोजी भारतीय स्टेट बँक ऑफ शाखा रामतीर्थ यांच्या वतीने सकाळी 9.30 ते 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील जनतेने जास्तीत जास्त या रक्तदान शिबिरात रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान द्यावे असे आव्हान एसबीआय बँकेचे शाखा अधिकारी अंकुश सुत्राळे यांनी केले आहे.

एसबीआय बँकेच्या 70 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने भारतीय स्टेट बँक शाखा रामतीर्थ येथील शाखेच्या कर्मचाऱ्यांनी हा स्थापनादिन अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाने साजरा करण्याचे नियोजन व आयोजन करून या दिनाच्या निमित्ताने येथील शाखेच्या प्रांगणात रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि रक्त हे कोणत्याही कारखान्यात उपलब्ध होऊ शकत नाही तर ते कोणी ना कोणी कोणाचातरी जीव वाचवण्यासाठी रक्त द्यावेच लागते म्हणून आज दिनांक 17 जून रोजी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे तरी परिसरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी आपले रक्तदान करावे असे आव्हान येथील शाखेचे शाखा प्रबंधक अंकुश सुत्राळे यांनी केले आहे.

बँकेच्या दैनंदिन कारभारात सामाजिक उपक्रम राबवले जात नाहीत मात्र भारतीय स्टेट बँक ऑफ शाखा रामतीर्थ यांच्या वतीने एसबीआय शाखेच्या 70 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर अशा स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शाखेचे शाखा प्रबंधक अंकुश सुत्राळे, शाखेचे फिल्ड ऑफिसर सचिन आंबेराव, निलेश दमकोंडवार, गिरीराज जंगीलवार, निखिल खोब्रागडे, शेषराव हनमंते
आधी सह अन्य शाखेचे कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker