आकाश पेट्रोलियमचा नवीन उपक्रम गंगणबीड फाटा येथे सीएनजी गॅस पंपाचा शुभारंभ
नायगाव : येथून जवळच असलेल्या गंगणबीड फाटा येथील आकाश पेट्रोल पंपावर चंद्रकांत बच्चेवार, भागवत लोकमनवार व ज्ञानेश्वर लोकमनवार यांच्या वतीने सी एन जी गँस पंप सुरु करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या सी एन जी वाहणांची संख्या विचारात घेवून सी एन जाते गँस पंपाचा उद्घाटन सोहळा दि. 18 आक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
नायगांव येथील प्रसिद्ध आकाश पेट्रोल पंप आणि डिझेल पंप उभे करून लोकांच्या गरजा पुरवल्या. अत्यंत दर्जेदार सेवा दिली त्यामुळे पेट्रोल डिझेल व्यवसायाबरोबरच आकाश पेट्रोलियमला सी एन जी गँस पंप सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. चंद्रकांत बच्चेवार, भागवत लोकमनवार व ज्ञानेश्वर लोकमनवार यांनी आता लोकांच्या सेवेसाठी आधुनिक अशा सीएनजी गॅस पंपाची उभारणी केली आहे.
नायगाव तालुक्यातील वाहणधारकांना सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नायगावच्या जवळ असलेल्या नांदेड -नायगाव रोडवर मौजे गंगनबीड फाटा येथे आकाश पेट्रोल पंपावरच सीएनजी पंप सुरु करण्यात आला असून याचा शुभारंभ दि.18 रोजी होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास मा.श्री.बालाजी बच्चेवार, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, मा.श्री.सतीशजी आहिरवार साहेब सेल्स ऑफिसर भारत पेट्रोलियम नांदेड. यांची उपस्थिती राहणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रकांत बच्चेवार, भागवत लोकमनवार, ज्ञानेश्वर लोकमनवार यांनी केले आहे.