नवीन कायद्यानुसार नागरिक आँनलाईन ई-एफआयआर दाखल करू शकतात ◆पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांची माहिती
कुंडलवाडी :- नवीन कायद्यानुसार नागरिक घरी बसून आपली आँनलाईन तक्रार देऊन ई एफआयआर दाखल करु शकतात. देशभरात नवीन कायदे १ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यात अनेक आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. अशी माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी दिली.
राज्याच्या गृह विभागाच्या वतीने सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नवीन कायद्यांची जनजागृती होण्यासाठी पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार कार्यक्रम घेण्यात येत आहे. कुंडलवाडी पोलीस ठाण्यात २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम जे भारतीय दंड संहिता, १८६० ची जागा घेईल; फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८, आणि भारतीय पुरावा कायदा, १८७२ अनुक्रमे २५ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची संमती प्राप्त झाली आणि १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आले.
पोलिसांच्या वतीने लोकांमध्ये नवीन कायद्याची जाणीव व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या जनजागृती सभेत माहिती देताना कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे म्हणाले की, भारतीय लोकांना या कायद्याची सवय झाली आहे. भारतीय कायद्यांच्या मदतीने समाज चालवणे.
समाजात झालेल्या आमूलाग्र बदलानंतर, सरकारने समाजात शांतता आणि शांतता राखण्यासाठी नवीन कायदा लागू केला आहे. नवीन कायद्यामध्ये नागरिक ई मेल आयडी वरून संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार करून ई- एफ आय आर दाखल करू शकतात. विशेषतः आगामी तरुणांना निरोगी व सामाजिक वातावरणासाठी नवीन कायद्यांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी केले.
या बैठकीस शहर व परिसरातील नागरिक, पत्रकार पोलीस पाटील, प्रतिष्ठित, नागरिक, व्यापारी आदीजण यावेळी उपस्थित होते.