लातूर जिल्ह्यातील वाळू माफीयाला प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्याचा दणका : हायवासह 40 लाखाचा मुद्देमाल जप्त

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असलेले किरण पोपळघट यांनी लाल वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील एका बड्या वाळू माफीयाला जोरदार दणका दिला असून. सोळा चाकी हायवासह 40 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे हप्ते घेणाऱ्या ठाण्यातील एका अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडले आहे.

महसूल विभागासह पोलीस अधिकारीही वाळूच्या धंद्यात गुंतलेले असल्याने नायगाव तालुक्यात अवैध वाळूचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या बळावर मोठ्या प्रमाणात माफीयागीरी सुरु आहे. मात्र या माफीयागीरीला जोरदार झटका देण्याचे काम नायगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी किरण पोटळघट यांनी १६ चाकी हायवा पकडला आहे.
तालुक्यात वाळूची चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी पोपळघट हे रविवारी सायंकाळी गडगा परिसरात निघाले असता. नरसीकडून मुखेडकडे एम एच २४/ बी डब्ल्यू २७२७ या क्रमांकाची हायवा भरधाव वेगाने जात होती. गडगेकर पेट्रोल पंपाजवळ पोलिसांनी सदरची हायवा थांबवली आणि हायवात कशाची वाहतूक होते आहे याची पाहणी केली असता लाल रंगाची ८ ब्रास वाळू होती. या वाळू वाहतुकीचा परवाना आहे का अशी विचारणा हायवा चालक अविनाश दिपक मळवटीकर यास विचारली असता परवाना नसल्याचे सांगितले.
यावेळी पोलीस कर्मचारी राजू गुरुपवार यांनी दोन पंचाना बोलावून रितसर पंचनामा करण्यात आला सदरचे लाल वाळूने भरलेले हायवा ही पोलीस स्टेशन नायगांव येथे आणली असता ती पोलीस स्टेशन मध्ये आणणे शक्य नसल्याने सुरक्षीतेच्या दृष्ट्रीने पुढील कार्यवाहीस्तव तात्पुरते पो.स्टे. रामतिर्थ येथे लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात वाळूची वाहतूक करणारे माफीया नायगाव पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याला नियमितपणे हप्ता देतात पण या कारवाईने ठाण्यातील त्या निष्क्रिय पोलीस अधिकाऱ्याचे पितळ उघडे पडले.
सदर प्रकरणी कलम ३०३(२) भा.न्या. संहीता २०२३ सह कलम ४८ (७) ४८ (८) 48(7) गौण खनिज कायद्या प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करुन हायवासह ८ ब्रास वाळू असा ४० लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.