Uncategorized

नायगावात धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमी उत्साहात साजरी

छत्रपती शाहू महाराज नगरात ध्वजारोहण ; भीमगीतांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : शहरातील छत्रपती शाहू महाराज नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपनगराध्यक्ष विजय शंकरराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सायंकाळी आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष विजय चव्हाण होते. यावेळी नगराध्यक्ष प्रा. संजय चव्हाण, नगरसेवक विठ्ठल बेळगे, नगरसेविका सुमनबाई भीमराव सोनकांबळे आणि युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक पाटील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सायंकाळी आठ वाजता शुद्धोधन कदम यांच्या संगीत रजनीअंतर्गत भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भीमगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दुसऱ्या सत्रात पंकज पाटील चव्हाण, विराज पाटील चव्हाण, सूरज आप्पा बेळगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अशोक गायकवाड, मंगेश हानवटे, विशाल भद्रे, प्रा. दिलीप मोरे, यशवंत डुमणे, रमेश भद्रे, जगदीश वंजारे, आनंदा कदम, हनुमंत हानवटे, बाबूराव झगडे, सिद्धार्थ गायकवाड, चंद्रकांत आंबेवार, अमोल जोंधळे, सुनील पोटफोडे, संजय भद्रे, राजेंद्र वाघमारे, राहुल इंगळे,नागोराव डूमने, बाळासाहेब भेदेकर, सूरज काळेवार, भूषण काळेवार, मंगेश बच्छाव, संकल्प जमदाडे, विकी लोखंडे,प्रकाश सोनकांबळे, नितीन गायकवाड, डॉ. वीरभद्रे, विनोद वाघमारे, शेषराव वाघमारे, ग्रामसेवक हनवटे आणि सुरेश सोनसळे यांच्यासह नगरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या स्मृतींना अभिवादन करत आणि विजयादशमीचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!