हुनगुंदा ते नागणी शिवरस्त्यावर मांजरा नदीपात्रातून महसूल कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू वाहतुकीचा ट्रँक्टर पकडला

कुंडलवाडी :- शहरापासून जवळच असलेल्या हुनगुंदा ते नागणी शिवरस्त्यावर मांजरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रँक्टर दि.१४ मार्च रोजी पहाटे ४:३० वाजता ग्राम महसूल अधिकारी बी.जे.कांबळे यांच्या पथकाने पकडले असून ट्रँक्टर जप्त करून कुंडलवाडी पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे.
कुंडलवाडी शहरापासून जवळच असलेल्या मांजरा नदी पात्रातून शासनाची कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीर रित्या शासनाचा महसूल बुडून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी बी.जे.कांबळे, राजू गाडेकर, अमित गायकवाड यांनी दि.१४ मार्च रोजी रोजी पहाटे ४:३० वाजता हुनगुंदा ते नागणी शिवरस्त्यावर मांजरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रँक्टर क्रमांक टि.जी.१६ इ १९६२ व ट्राँली क्र.टि.जी.१६ इ १९६२ जप्त करून पुढील कारवाईसाठी कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात लावण्यात आले आहे.



