ताज्या बातम्यानांदेडनायगांव

​’सेवा संकल्प’ अभियानातून तीन बालकांना नवजीवन ; नायगाव RBSK पथकाचा स्तुत्य उपक्रम

प्रकाश महिपाळे

नायगाव : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा (RBSK) अंतर्गत घेतलेल्या आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये गंभीर आजार आढळलेल्या तीन बालकांवर ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामुळे या बालकांना नवीन आयुष्य लाभले असून पालकांनी आरोग्य यंत्रणेचे मनापासून आभार मानले आहेत.

शासनाच्या नियमानुसार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वर्षातून एकदा शाळांमधील विद्यार्थ्यांची, तर वर्षातून दोनदा अंगणवाडीतील बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. नायगाव तालुक्यातील तपासणीदरम्यान ३ बालकांना गंभीर आजार असल्याचे निदर्शनास आले होते.

यामध्ये सूरज संताजी बेंबरे या बालकाला हृदयाचा आजार असल्याचे निदान झाले होते. त्याच्यावर ‘लोटस हॉस्पिटल, नांदेड’ येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच मुदसिर मौला शेख व आराध्या प्रदीप काळेवार या दोन बालकांच्या डोळ्यांवर ‘गणपती नेत्रालय, जालना’ येथे यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

ही आरोग्य सेवा व शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीकांत पटवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली.

या मोहिमेसाठी RBSK चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील वाघमारे, डॉ. प्रियंका वानोळे, औषध निर्माण अधिकारी अतिक रहेमान व परिचारिका एम. एम. कल्लूरे यांनी विशेष परिश्रम घेतले. वेळेवर झालेल्या निदानामुळे आणि वैद्यकीय पथकाच्या तत्परतेमुळे तीनही बालकांवर यशस्वी उपचार शक्य झाले असून तालुक्यातून RBSK पथकाचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!