खा.रवींद्र चव्हाण यांच्याकडून वाघमारे कुटुंबीयांचे सांत्वन

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नरसी येथील पत्रकार दिलीप वाघमारे यांच्या मातोश्री पार्वतीबाई माधवराव वाघमारे यांचे गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. या दुःखद प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर खासदार रवींद्र चव्हाण यांनी रविवारी वाघमारे यांच्या निवासस्थानी भेट देऊन शोकाकुल वाघमारे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी आस्थेने संवाद साधत दुःखाच्या प्रसंगी धीर देत या दुःखाच्या प्रसंगी सांत्वनासाठी दिलेली ही भेट आणि जुन्या ऋणानुबंधांना उजाळा देणारा संवाद यामुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.
स्व.पार्वतीबाई वाघमारे यांना २६ सप्टेंबर रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. १० ऑक्टोबर रोजी नरसी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जुन्या आठवणींना उजाळा सांत्वनपर भेटीदरम्यान दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्यासोबत चार दशकांपासून जिव्हाळ्याचे संबंध असलेले जुने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत दिवंगत वसंतराव चव्हाण यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भास्कर पाटील जिगळेकर, प्रमोद वाघमारे (कॉन्ट्रॅक्टर), शेख बाबूभाई, कुंचेलीकर पटेल, माधव डोनगावे मुगावकर, मधुकर ताटे, लालबा सुर्यवंशी, अनिल कांबळे, शेख जब्बार, भीमराव भवरे, अनिल पवळे, सहाय्यक पीए, श्रीनिवास सोमनकर, राजू वाघमारे, विठ्ठल भेदे, राजू कामघंटे, शुभम पांचाळ, संजोक मुसळे, नागेश भेदे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.



