हुनगुंदा ते नागणी रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला
◆बिलोली तहसीलच्या पथकाची कारवाई

कुंडलवाडी :- शहरापासून जवळच असलेल्या हुनगुंदा ते नागणी रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रक बिलोली तहसील च्या महसूल विभागाच्या पथकाने पकडून जप्त केले आहेत. हि कारवाई दि.दि.१ मे रोजी सकाळी ७ वाजता करण्यात आली. या कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणा-यांत खळबळ उडाली आहे.
बिलोली तालुका मांजरा नदीत असलेल्या लाल वाळूसाठी प्रसिद्ध आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी बिलोली तहसीलने उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे.
दि.१ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हुनगुंदा ते नागणी रोडवर अवैधरित्या वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक करताना एम एच ४० सी एम २१८३ क्रमांकाचा ट्रक बिलोली तहसीलच्या महसूल विभागाचे मंडळाधिकारी लक्ष्मीकांत अंबेराय, तलाठी पवन ठकरोड, तलाठी भगवान पाटील यांच्या पथकाने पकडले. पथकाने ट्रँक्टर जप्त करून कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आणुन लावण्यात आले आहेत.
सदरील जप्त केलेल्या ट्रँक्टरवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती बिलोली तहसील कार्यालयाकडून दिली आहे.