Uncategorized

ब्ल्यु बर्डस टेक्नो स्कूल च्या चिमुकल्यांनी प्रेक्षकांचे जिंकली मने

नायगाव :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षीही गडगा येथील ब्ल्यु बर्डस टेक्नो स्कूलमध्ये दि.६ मार्च रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी वेगवेगळ्या गीतावर बहारदार असे नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सदर कार्यक्रमास प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.

नरसी येथील नंदेश्र्वर कोरे व पुजा कोरे या दांपत्याकडून गडगा येथे इंग्रजी शाळा सुरू करण्यात आली. गेल्या बारा वर्षां पुर्वी सुरू झालेल्या या शाळेत गडगा, नरसी होटाळा, नावंदी, मरवाळी, कोपरा, मोकासदरा, मांजरम आदी गावातील ३८० विद्यार्थ्यां शिक्षण घेत असुन येथे शिक्षण घेत असेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक दर्जेदार शिक्षण देत असल्याने ही शाळा कमी कालावधीत नावारूपास आली आहे.

६ मार्च रोजी झालेल्या सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटन सौ.मंगल अशोक जोगदंड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. व्यासपिठावर प्रमुख पाहुने म्हणून डाॅ.उमाताई नीलम पाटील, महेश कुंटुरकर, डाॅ.यशोदा सोनवणकर, सहशिक्षक संगीता शिवशंकर कोरे ल, सरपंच लक्ष्मीबाई पवळे, मु.अं.अश्विनी गोपाळराव हडपकर, गीता गणपत सलगरे व शाळेच्या मु.अ.पुजा नंदेश्र्वर कोरे आदीची उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी स्वागत गीत, श्री गणेशा वंदन गीत, देशभक्तीपर गीत, मराठी लावणी, हिंदी, तेलुगु मराठी आदी गीतासह गोंधळ, आदी लोकगीतावर दर्जेदार नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी प्रक्षेकांची मने जिंकली. यावेळी देविदास पवळे, सुहास पा.टाकळीकर, पो.पा.भांगे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बरगे, प्रा.शिवशंकर कोरे, रावसाहेब पा.शिदे आदीची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक पुजा कोरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नदेश्र्वर कोरे व सहभागी सर्व विद्यार्थी शाळेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker