विकलांग दृष्टीहीन सेवानिवृत्त शिक्षक शंकर संगेवार यांच्यावर निवृत्ती वेतनासाठी उपोषणाची वेळ…
New Bharat Times नेटवर्क
कुंटूर :- बोधडी येथील जिल्हा परिषद शाळा येथे दिव्यांग शिक्षक शंकर राजेंद्र संगेवार हे वयमानानुसार 31 ऑगस्ट 2023 रोजी विशेष शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले सव्वा वर्षाचा कार्यकाळ निघून गेल्यानंतर सेवानिवृत्तीचे वेतन मिळावे यासाठी त्यांनी नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभाग कडे सातत्याने पाठबोरा करूनही त्यांना न्याय मिळाला नाही त्यांना आज त्यांना जिल्हा परिषद समोर उपोषण करण्याची वेळ आलेली आहे.
आणि त्यांना याच जिल्हा परिषदेने गुरु गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. व त्यांनी या अगोदर आपल्या घरी मुलं पोसून आठवी ते दहावी या मुलांना सातत्याने शिक्षण दिले व त्यांनी नेहमीच सामाजिक कार्यामध्ये हिरीरीने भाग घेतले. आज त्यांच्यावर अशी वेळ आलेली आहे की सध्या त्यांना शुगर बीपी मणक्याचा आजार व्याधीने त्रस्त आहेत आणि त्यांची एन्जोप्लास्टी झालेली आहे व त्यांची आज परिस्थिती एकदम हलक्याचे आहे त्याकरता त्यांचा मुलगा रवी शंकर संगेवार आई-वडिलांसह आज दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे आमरण उपोषणासाठी बसलेला आहे.
बोधडी येथील शंकर राजेंद्र संगे वारे 31 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा परिषद बोधडी शाळेतून पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत एक वर्षा चार महिने कार्यकाळ उठून गेला अनेक वेळा संबंधित कार्यालयात चौकशी केली जाऊन भेटी पण या सेवानिवृत्त शिक्षकांनी गोड बोलून बोलवण केली.
आज जवळपास 15 महिन्याचा कार्यकाळ उठला असून सदरील शिक्षकांच्या कुटुंबास दुसरा कोणताही उत्पन्नाचा स्त्रोत्र नाही शिक्षण स्वतः दिव्यांग आहेत यांना अनेक व्याधीने ग्रस्त आहेत व त्यांचा उपचार नांदेड जिल्हा सोडून वाशिम या ठिकाणी झालेला आहे व त्यांना या पुढील उपचारासाठी कोणता स्तोत्र नाही.
त्यामुळे त्यांचा मुलगा रवी किरण 21 जानेवारी रोजी जिल्हा परिषद नांदेड येथे आई-वडिलांचा उपोषणाला बसलेला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या कुटुंबास न्याय द्यावा व दिव्यांग शिक्षक शंकर राजेंद्र संगेवार यांचे तातडीने मागण्या मान्य करून या परिवारास सहकार्य करावे.