ताज्या बातम्यानांदेडनायगांव

दोन समाजातील दरी कमी करण्यासाठी नरसीत बौध्द-मातंग ऐक्य परिषद

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : राजकीय हेतूने काही राजकारणी बौद्ध आणि मातंग समाजात दरी वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. मात्र बौध्द आणि मातंग हे एकदुसऱ्याचे विरोधक नसून पुरक आहोत हा सामाजिक संदेश देण्यासाठी नरसी येथे (ता.१९) रोजी बौद्ध-मातंग ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहीती देविदास सुर्यवंशी, साईनाथ कांबळे, गंगाधर कोतेवार व सचिन भेदे यांनी दिली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसापासून जाणीवपूर्वक दोन समाजात भांडणे लावण्याचा उद्योग सुरु आहे. दोन दिवसापुर्वी नरसी चौकात रास्तारोको आंदोलन करुन द्वेषाचे वातावरण निर्माण करणाऱ्या राजकारण्यांचा निषेधही करण्यात आला. त्यामुळे बौध्द आणि मातंग समाजातील ऐक्य कायम असावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते देविदास सुर्यवंशी, साईनाथ कांबळे, गंगाधर कोतेवार व सचिन भेदे यांनी पुढाकार घेवून नरसी येथे (ता.१९) रोजी बौध्द-मातंग ऐक्य परिषद आयोजित केली आहे.

या ऐक्य परिषदेचे उद्घाटन डि.पी.आय महाराष्ट्र या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या हस्ते होणार असून. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आँल इंडिया पँंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिपकभाऊ केदार हे असतील तर लसाकमचे राज्य सहसचिव डॉ. दयारामजी मस्के हे प्रमुख वक्ते असणार आहेत. यावेळी आँल इंडिया पँंथर सेनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद भोळे, डि.पी.आय. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहण वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बौध्द-मातंग ऐक्य परिषदेला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बौध्द आणि मातंग समाज हा एकाच विचारधारेवर चालणारा आहे. एकमेकामध्ये बंधुभाव रूजवण्यापेक्षा दरी वाढवण्याचे षडयंत्र सुरु आहे. त्यामुळे सामाजिक द्रष्ट्या मोठे नुकसान होत आहे. आणि समाजात दरी निर्माण करणारे याचा फायदा घेत आहेत त्यामुळे भावी पिढीच्या भवितव्यासाठी आणि सामाजिक न्याय हक्कासाठी एकत्र यावे यासाठी पक्ष, राजकारण विरहीत ही परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे परिषदेचे संयोजक देविदास सुर्यवंशी, निमंत्रक साईनाथ जिगळेकर, संयोजक गंगाधर कोतेवार व सचिन भेदे यांनी माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker