ताज्या बातम्यानांदेडनायगांव

वऱ्हाडाचा उलटलेला टेम्पो महामार्गावरच असल्याने मोटरसायकलला अज्ञात वाहनाची धडक

मोरे मनोहर
किनाळा :- वैजापूर पारडी तालुका मुदखेड येथुन देगलूर तालुक्यातील शहापूर येथे लग्नासाठी जाणारा टेम्पो नांदेड देगलूर राज्य महामार्गावर किनाळा तालुका बिलोली येथे दिनांक 5 मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली असताना या भिषण अपघातात 23 जण वऱ्हाडी मंडळी जखमी झाल्याची घटना घडली असताना या अपघातातील टेम्पो
महामार्गावरून बाजूला न काढल्याने याच टेम्पो जवळ आज दिनांक 6 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास याच टेम्पो जवळ मोटरसायकलला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्यानें या झालेल्या दुसऱ्या अपघात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

शहापूर तालुका देगलुर येथे विवाह सोहळ्यासाठी वैजापूर पारडी येथून वराडी मंडळी एम. एच.26 एडी 6572 या टेम्पोमध्ये जात असताना हा टेम्पो नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या किनाळा तालुका बिलोली येथे रस्त्याच्या मधोमध उलटून भिषण अपघात झाला या अपघातात 23 जण जखमी झाल्याने येथील गावकऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमींना उपचारासाठी पाठवून दिले असल्याने या अपघातात सुदैवाने कोणाचीही जीवित हानी झाली नाही.

या अपघातामुळे विवाह असलेल्या शहापूर आणि वधुच्या गावाकडील मंडळीची धावपळ सुरू असताना या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याचे वृत्त कहिजनाने व्हाट्सअप व फेसबुक वर टाकल्याने अनेक नातेवाईकांना या चुकीच्या पोस्टचा मानसिक धक्का बसला या दुःखद प्रसंगाला सावरत विवाह सोहळा संपन्न करण्यात आला.

या अपघातातील टेम्पो ट्राफिक पोलीसांनी महामार्गावरून बाजूला न काढल्याने याच टेम्पो जवळ आज दिनांक 6 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास नरसी कडून देगलूर कडे येत असलेल्या एम एच 26 बि यू. 1679 या मोटारसायकला पाठिमागुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने संतोष मोहन वडजे हा तांदळी तालुका मुखेड येथील युवक गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker