येळीच्या पुलावरून क्रुझर गोदावरी नदीत कोसळली दोनजण ठार

बालासाहेब शिंदे
मारतळा :- मुदखेडकडून येळीकडे येणारी एक क्रुझर कंपनीची चारचाकी गाडी भरधाव वेगात येळीच्या पुलावरून गोदावरी नदीमध्ये कोसळल्यामुळे पाण्यात बुडून गाडीच्या चालकासह अन्य एकाजनचा मृत्यू झाल्याची घटना दि.१० मे रोजी सायंकाळी लोहा तालुक्यातील येळी येथे घडली.
मुदखेड कडून महाटी मार्गे ही गाडी येत असताना येळीं येथील पुलाजवळ गाडी आल्याने वेगात असलेल्या गाडीचे नियंत्रण चालकाच्या हातून सुटले व ही गाडी थेट गोदावरी नदीत जाऊन कोसळली या गाडीत असलेले उध्दव आनंदा खानसोळे (वय ३२ रा.शिखाची वाडी ता.मुदखेड) आणि थोराजी मारोती ढगे (वय २२ रा.येळी ) यांचा बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती गावकऱ्यांना समजताच बोटीच्या साहाय्याने दोनी मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
यावेळी घटना स्थळी उस्माननगरसह मुदखेड येथील पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले व दोन्ही शव उत्तरीय तपासणी साठी मुदखेड येथील शासकीय दवाखाण्यात पाठवण्यात आले ही घटना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती या घटने बाबत अद्याप पर्यंत गुन्हाt दाखल झाला नव्हता. यातील थोराजी ढगे हा अविवाहित असल्याचे समजते त्याच्या मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
यावेळी मुदखेडचे पोलीस निरीक्षक सपरे, उस्मांननगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार,उप निरीक्षक गाडेकर,शिवराज ढगे यांनी मदत केली.