ताज्या बातम्यानांदेडनायगांव

अटकळी येथील अवैध देशीदारू विक्री बंद करावे यासाठी बचत गटाच्या महिला पोलीसात

मोरे मनोहर

किनाळा :- अटकळी तालुका बिलोली येथे मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू विक्री केली जात असल्याने कित्येकांचे संसार उध्वस्त होत आहेत.अनेक तरुण युवक व्यसनाच्या आहारी जाऊन आपले आरोग्य धोक्यात घालत असल्याने गावात होणारी अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील बचत गटाच्या महिलांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात दि.9 मे रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे कळवले आहे.

सविस्तर माहिती अशी की नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या अटकळी तालुका बिलोली येथे सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावात एकाचे पाहून एक असे सहा ते सात जन विना परवाना गल्लो गल्ली देशी दारू विक्री करत असल्याने गावातील अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात देशीदारू पिउन सुखी संसार उध्वस्त करत आहेत.तरुन युवक व्यसनाच्या विळख्यात सापडली जात आहेत.

शासनाला दारू विक्रीचा माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो हे सत्य असले तरी दारू विक्रीमुळे अनेक सामान्य कुटुंबातील कित्येक नागरिक दारू पिऊन त्यांचे संसार उध्वस्त होताना हे देशाचे राजकारण करणाऱ्या राजकारणी नेत्यांना कळत नाही का? एखाद्या कुटुंबातील पत्नीने पतीला दारू पिऊ नये असे सांगितले तर तिलाच पतीकडून मारहाण केले जाते, तरुण युवक व्यसनाच्या आहारी जाताना आई-वडील समजावण्याचा प्रयत्न केले तर त्या आई-वडिलांनाच घराबाहेर काढले जातात अशा वेळी कित्येक वयोवृद्ध माता पित्यांनवर आत्महत्या करण्याची वेळ येते.

दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याने गावातील अवैध देशी दारू विक्री व मटका तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी गावातील महिला एकवटलेल्या असुन 9 मे रोजी बचत गटाच्या महिला रामतीर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन निवेदन दिले असून गावातील विनापरवाना देशी दारू व मटका बंद न केल्यास संबंधित कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

गावात कोण कोण व्यक्ती विनापरवाना देशी दारू विक्री करतात आणि कोण कोण व्यक्ती गावात मटका घेतात अशा व्यक्तीच्या नावासह रामतीर्थ पोलीस ठाण्यात बचत गटाच्या महिलांनी लेखी निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई करून गावातील मटका व विदेशी दारू तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी बचत गटाच्या गयाबाई गौतम शेरे, धुरपतबाई मारोती शेरे, भारतबाई मारुती भालेराव, पमाबाई रमेश भालेराव, शोभाबाई शंकर शेरे, चंदरबाई हनमंत शेरे, मायावती नितीन गायकवाड, विमलबाई यादव शेरे, अंजनबाई लालू शेरे, पदमीनबाई सुरेश भालेराव, सुरेखा यादव शेरे, यशोदा भीमराव शेरे, नर्मदाबाई मल्लू भालेराव, शांताबाई प्रकाश शेरे या सह अनेक महिला बचत गटाच्या महिला रामतीर्थ पोलीस ठाण्यात येऊन निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker