श्री.मधुकरराव पाटील खतगावकर महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण

मोरे मनोहर
किनाळा :- शंकरनगर तालुका बिलोली येथील गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ने ठरवून दिलेल्या नियमानुसार पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला.

दि.११ जुलै रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पदवी वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या तथा गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव डॉ. सौ. मिनलताई पाटील खतगावकर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून खतगाव येथील श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळासाहेब पाटील खतगावकर, विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मूल्यांकन केंद्राचे संचालक प्रा.डॉ. संभाजी कबाडी हे उपस्थित होते.
महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख प्रा.गोविंदराज पांचाळ यांनी प्रास्ताविक केल्यानंतर प्राचार्य डॉ .शिवाजीराव पाटोदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करावा असे डॉ. सौ. मिनलताई पाटील खतगावकर म्हणाल्या ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना रोजगारासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाला महत्त्व असल्यामुळे असे व्यवसायिक अभ्यासक्रम संस्थेमध्ये सुरू करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी बाळासाहेब पाटील खतगावकर आणि प्रा. डॉ .संभाजी कबाडी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देताना तुम्ही घेतलेल्या शिक्षणाच्या जोरावर तुमचे तुमच्या आई वडिलांचे व महाविद्यालयाचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा बाळासाहेब पाटील खतगावकर यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी कला शाखेतील १९, वाणिज्य शाखेतील २७ आणि विज्ञान शाखेतील ७१ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ.शिवाजी कांबळे यांनी केले तर, प्रा.डॉ.अनिल माने यांनी आभार मानले. या समारंभास प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.