ताज्या बातम्यानांदेडबिलोली

हत्येचा प्रयत्न प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

New Bharat Times नेटवर्क

बिलोली : हत्येचा प्रयत्न प्रकरणातील दोन आरोपींचा नियमीत जामीन अर्ज बिलोली जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. व्ही. बी बोहरा यांनी शुक्रवारी फेटाळला. अंजनी ता. बिलोली जि. नांदेड येथील गोविंद तुळशीराम गंधाफुले यांच्यावर दि.१६ जुलै २०२४ रोजी प्राणघातक हल्ला झालेला होता.

त्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादेवरून चार जणांविरूध्द पोलिस ठाणे बिलोली येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११८(२), ११९(१), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंद क. १६३/२०२४ हा दाखल करण्यात आला होता व त्यानंतर सदर गुन्हयात भारतीय न्याय संहिता चे कलम ११९ (२) व ६१ (२) हे नव्याने समाविष्ठ करण्यात आले होते. त्यावरून ३ आरोपींना दिनांक १८ जुलै रोजी तर एकास दिनांक १९ जुलै रोजी अटक करण्यात आली. सध्या चारही आरोपी हे न्यायालयीन कोठडीत असुन गुन्हयाचा तपास चालु आहे.

दरम्यान सदर गुन्हयातील २ आरोपींनी दि. १ ऑगष्ट रोजी अँड. एम. एम. आरळीकर यांच्यामार्फत बिलोली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात नियमीत जामीन अर्ज क्र. १०९/२०२४ दाखल केला होता. सदर प्रकरणात विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. व्ही. बी बोहरा यांच्या न्यायालयात दिनांक ९ ऑगष्ट रोजी अंतीम सुनावणी होवुन अभिलेखावरील प्रथमदर्शी पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राहय धरत आरोपींचा नियमीत जामीन अर्ज फेटाळण्यात आला. सदरच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सायंकाळी ऊशीरा आदेश झाल्यामुळे सविस्तर आदेश हाती आलेला नाही.

याप्रकरणात आरोपींच्या वतीने अँड. एम. एम आरळीकर यांनी बाजु मांडली तर सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील श्री. कुंडलवाडीकर यांनी काम पाहीले. तसेच सदर प्रकरणात फिर्यादी यांच्यातर्फे अँड. आय. सी तळणीकर यांनी सरकारी पक्षास सहाय्य केले तर त्यांना के. जी देशमुख व झेड. एम देशमुख यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker