ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर विशेष पॅकेजसाठी मुंबईत बैठक बोलवा ; खा.रवींद्र चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अंकुशकुमार देगावकर

नांदेड : जिल्ह्यातील पूरस्थिती अत्यंत गंभीर बंदी असून अतिवृष्टीग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज देण्यासंबंधी मुंबईत मंत्रालय स्तरावर तातडीची स्वतंत्र बैठक आयोजीत करावी अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धर्माबाद तालुक्यातील कारेगाव फाटा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांची भेट घेतल्यानंतर खासदार रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले.

नांदेड जिल्हयामध्ये दि. २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पोचंमपाड (तेलंगणा) राज्य धरण्याच्या बॅक वॉटरमु‌ळे गोदाकाठच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामु‌ळे विशेषतः धर्माबाद, उमरी, बिलोली, मुखेड, नामगाव तालुक्यासह इतर ठिकाणच्या नदीकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून. सर्व पिके वाहून गेली आहेत. नदीकाठच्या अनेक गावातील घरांची पडझाड झाली असून. अनेक कच्ची, पक्की घरे, निवारा, जीवनावश्यक वस्तू उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनूष हानीसहीत शेतक-यांची, पशुपालकांची आर्थिक हानी झालेली आहे.

याबाबत शासनामार्फत कुठलेही मदत अ‌द्याप मिळालेली नाही. तसेच बाधित गावांसाठी भौतीक सुविधा, तातडीची उपाय योजना करण्यात आलेली नाही. यामुळे विशेषत तेलंगाणा राज्य सिमेलगत असलेल्या गावांचे, शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. या बाबत नुकसानग्रस्त शेतक-यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून मागील पाच दिवसांपासून तीव्र साखळी उपोषण कारेगांव फाटा ता. धर्माबाद येथे सुरू आहे. या भागामध्ये १९८३ पेक्षाही भयकर पूर परीस्थीती अनुभवायला मिळाली आहे. याबाबतचा अहवाल शासनाकडे प्रशासकीय यत्रणे मार्फत दाखल झालेला असेल.

त्या अनुषंगाने विशेष पॅकेजचा निर्णय होत असतांना नांदेड जिल्ह्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करून कोल्हापूरच्या धर्तीवर आर्थीक मदत मिळणे आपेक्षीत आहे. ही बैठक आयोजीत करीत असतांना माझ्या सहीत विरोधी पक्षाच्या लोकपतिनिधींना बैठकीसाठी बोलविण्यात यावे. जेणे करून झालेल्या नुकसानीची सत्यता अहवालाच्या अनुषंगाने आपल्या समोर मांडता येईल.याबाबत सकारात्मक विचार करून नांदेड जिल्हयासाठी छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई येथे त्वरीत बैठक आयोजीत करण्यात यावी, अशी विनंती खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी या निवेदनात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker