क्राईमगावाकडच्या बातम्यानायगांव

कुंटूर पोलिसांनी गव्हाचा ट्रक पकडला : कारवाईचा चेंडू तहसीलदाराच्या कोर्टात

प्रकाश महिपाळे

नायगाव : देगाव शिवारात एका धाब्यासमोर उभ असलेल्या ट्रकमध्ये राशनचा गहू असल्याची माहिती (ता.११) ला रात्री १२.३० च्या दरम्यान मिळाली. त्यामुळे कुंटूर पोलिसांनी सदरच्या ट्रक चालकाकडे चौकशी केली असता ट्रकमधील गहू कुठून आणला व कुठे जाणार आहे याची माहिती तर दिलीच नाही पण सोबत कागदपत्रेही नव्हती. त्यामुळे एम एच २६, एडी ७५८६ या ट्रकमधील २४ टन गव्हाबाबत संशय निर्माण झाल्याने कुंटूर पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे.

कुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संभाजी कदम हे डिव्हिजन पेट्रोलींग करीत असतांना, त्याना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, देगाव शिवारात दाल मखनी धाब्याजवळ ट्रक क्र. एम एच २६, एडी ७५८६ मध्ये स्वस्त धान्य दुकानाच्या गव्हाची चोरटी वाहतुक करीत आहे, अशी माहिती मिळाल्याने, कदम व पोलीस जिप चालक सपोउपनि सुरेश लोणीकर अदि पोलीस जिपसह माहिती मिळालेल्या ठिकाणी जावून सदर वाहनाचा शोध घेतला.

माहिती मिळालेले वाहण मिळुन आल्याने, वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता. त्याने त्याचे नाव शेख अब्दूल अजीज अब्दुल सत्तार वय ४९ वर्ष व्यवसाय ड्रायव्हर रा. दातार चौक शिवाजीनगर, नांदेड असे असल्याचे सांगीतले. पोलिस उपनिरीक्षक कदम यांनी सदर ट्रक मध्ये काय माल आहे व कोठुन आणले आहे, याबाबत विचारपुस केली असता, चालकाने ट्रकमध्ये गव्हाचा माल असल्याचे सांगीतले, परंतु तो माल कोठून आणला याबाबत काही सांगीतले नाही.

पोलीसांनी ट्रक मधील मालाची पाहणी केली असता, ट्रक मध्ये अंदाजे ४० ते ५० किलो वजनाचे पांढऱ्या रंगाचे पोते दिसुन आले. सदरचा गहू २४ टन होता मात्र चालकास ट्रकचे कागदपत्रे व त्यामधील गव्हाचे मालासंबधी बिल्टी व कागदपत्रे मागीतले असता जवळ नसल्याचे सांगीतले. ट्रक चालक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलीसांन ट्रकमध्ये असलेल्या गव्हाबाबत संशय आला. त्यामुळे पुढील चौकशी करण्यासाठी सदरचा ट्रक कुंटूर पोलीस ठाण्यात लावण्यात आला.

संशयास्पद गव्हाचा ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आल्यानंतर कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक भोसले यांनी (ता.११) रोजी नायगाव तहसीलदारांना एक पत्र लिहीले असून. ठाण्यात लावण्यात आलेल्या मधील गव्हाचा पंचनामा करण्यात यावा व गव्हाचे नमुने घेवून हा गहू भारतीय खाद्य निगमद्वारा स्वस्त धान्य दुकानातून वितरण करण्यात येणारा गहू आहे का याबाबत अभिप्राय मागवला आहे.

सदरच्या ट्रकमध्ये पांढऱ्या पोत्यात गहू असून तब्बल २४ टन असल्याची माहिती कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी दिली आहे. पण हा गहू राशनचा असल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार तहसीलचा पुरवठा विभागाला आहेत. मात्र आजपर्यंतचा इतिहास पाहील्यास पुरवठा विभाग हा नेहमीच राशनचा काळाबाजार करणाऱ्यांच्या बाजूने राहीला आहे. त्यामुळे या प्रकरणी तहसीलचा पुरवठा विभाग काय भुमिका घेतो हे पाहणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker