हुनगुंदा शिवारातील मांजरा नदीपात्रातून कुंडलवाडी पोलीसांनी अवैध वाळू वाहतुकीचा ट्रँक्टर पकडला
◆२ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कुंडलवाडी :- शहरापासून जवळच असलेल्या हुनगुंदा शिवारातील मांजरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रँक्टर दि.६ मे रोजी पहाटे ५:३० वाजता कुंडलवाडी पोलिसांनी पकडले असून ट्रॅक्टर चालक व ट्रँक्टर मालकाविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी ‘न्यू भारत टाइम्स’शी बोलताना दिली आहे.
कुंडलवाडी शहरापासून जवळच असलेल्या मांजरा नदी पात्रातून शासनाची कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीर रित्या शासनाचा महसूल बुडून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, पोहेकाँ रामेश्वर पाटील यांंनी दि.६ मे रोजी रोजी पहाटे ५:३० वाजता हुनगुंदा शिवारातील मांजरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रँक्टर क्रमांक एम.एच.२६ एआर १७१४ वर कारवाई केली.
या कारवाईत २ लाख रुपयाचे ट्रॅक्टर व ९ हजार रुपयांची दिड ब्रास वाळू असा २ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर काशिनाथ डुकरे (रा.का-हाळ) व ट्रँक्टर मालक या दोन जणांविरुद्ध सपोनि ज्ञानेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपी पैकी ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर डुकरे यास ताब्यात घेतले असल्याची माहिती कुंडलवाडी पोलिसांनी दिली आहे.