नांदेड गवळी समाजातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारोहास पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन…

जयवर्धन भोसीकर
नांदेड :- नांदेड येथे गवली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी प्रज्ञा जागृती मिशन वतीने सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता मारवाडी धर्मशाळा, साथी बालाराम यादव नगर, वझीराबाद नांदेड येथे गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा.अबिनाश कुमार सर मुख्य मार्गदर्शक अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा विद्यार्थ्यांना आणि समाजाला मोठा लाभ होणार आहे.
अबिनाश कुमार हे उत्कृष्ट प्रशासनिक अधिकारी असून त्यांनी पोलिस विभागात कार्यरत असून सामाजिक सहकार्य, शिस्त आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध उपक्रम ते नियमितपणे राबवीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेड पोलिसांनी स्थानिक सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना केल्या असून, त्यांचा अनुभव व मार्गदर्शन नवीन पिढी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या समारंभात शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती तसेच इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे नव्या पिढीला प्रोत्साहन देऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रज्ञा जागृती मिशनचे कार्यकर्ते एकजुटीने मेहनत घेत असून, गोकुल यादव, डॉ. संतोष मंडले, बिरबल यादव, सुशांत यादव, अॅड. ऋषी यादव, अमोल चौधरी, गौरव यादव, योगेश रौत्रे, दिनेश रौत्रे, महेश यादव, गोविंद मंडले, राजेश गवळी, ईश्वर यादव, दर्शन फतेलष्करी, मयूर परीवाले, सुनील लुले, भावेश यादव यांचा विशेष सहभाग आहे. तसेच यादव महासभेचे बिशनकुमार शामलाल यादव, नरसिंग गुम्मनलाल मंडले, राधाकिशन लक्ष्मणजी यादव, गजानन भानुदास यादव (न्यायाधीश, गंगाखेड), तुलजेश गणेशलाल यादव, किशोर किशनलाल यादव, धीरज ईश्वरलाल यादव (सर्व माजी नगरसेवक, नांदेड म.न.पा.), गणेशलाल किशनलाल भातावाले, गोपाल घनश्याम फत्तेलष्करी, भारत शामलाल यादव, सुंदरलाल प्रभुलाल भातावाले, विनय बाबूलाल यादव आणि स्वराज संजय यादव यांचा कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन आहे.
प्रज्ञा जागृती मिशनचे सचिव गगन लालामन यादव व कार्यक्रम संचालक डॉ. (प्रा.) कैलाश भानुदास यादव यांनी समाजातील सर्व बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे आणि त्यांच्या यशाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन केले आहे.