किनाळा येथील आरोग्य तपासणी शिबीरात चारशे रुग्णांची तपासणी व मोफत औषधी वाटप…

मोरे मनोहर
किनाळा :- प्राचेत मेडिकल फाउंडेशन व ग्लोबल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड आयोजित डॉ. दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 13 ऑगस्ट रोजी किनाळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास डॉ.सुशील रंगदळ अस्थिरोग तज्ञ, डॉ.गौरव पुंडे हृदयविकार तज्ञ व डॉक्टर मयुरेश राम पुरकर निरो सर्जन आदिसह अनेक तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते या शिबिराचे उद्घाटन आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून या शिबिरात सुमारे चारशे रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधी देण्यात आले.
प्रत्येक कुटुंबातील नागरिकांचे आरोग्य उत्तम असेल तरच ते कुटुंब सुखी व समाधानी राहू शकते अन्यथा ज्या कुटुंबातील नागरिकांचे आरोग्य बिघडलेले असते त्या कुटुंबात अनेक अडचणी असतात म्हणून अशा आरोग्य बिघडलेल्या नागरिकांना ग्रामीण भागात योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार मिळाले पाहिजे हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून किनाळा येथील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नांदेड पंचायत समितीचे केंद्रप्रमुख विकास लक्ष्मण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असता या शिबिरात योग्य व गरजू रुग्णांना एकही रुपया खर्च लागू न देता पूर्णपणे आरोग्य तपासणी करून मोफत औषधी देण्यात आले असुन रुग्णांना दहा लाखांपर्यंत मोफत इलाज केला जाईल असे सांगितले.
या शिबिराचे उद्घाटक म्हणून आमदार जितेश अंतापुरकर यांनी बोलताना कार्यक्रमाचे आयोजक व गावातील सरपंच उपसरपंच यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करुन नांदेड सारख्या शहरात नामवंत असलेल्या डॉक्टर मंडळींनी ग्रामीण भागात येऊन सामान्य नागरिकांची आरोग्य तपासणी व मोफत औषधी दिले याबद्दल वैद्यकीय मंडळींचेही त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री पाटील साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बिलोली, नांदेड पंचायत समितीचे केंद्रप्रमुख विकास मोरे, किनाळा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम, किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने, उपसरपंच बालाजी पाटील भोसले, गोविंदराव पाटील भोसले, भाजपा तालुका अध्यक्ष मारुती राहिरे, हिप्परगा माळ येथील सरपंच तिरुपती पाटील डाकोरे, चिकमोगरा येथील सरपंच आकाश कोकणे, जयवंतराव गायकवाड, संतोष पाटील भक्तापुरे आदिसह अनेक मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवर व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी गावातील पोलीस पाटील राजु पाटील भोसले, पत्रकार यशवंत मोरे, मारुती पाटील मोहिते, भुजंगराव पाटील भोसले, शिवराम आप्पा भत्ते, मरीबा मोरे, नागेश मोहिते, राजकुमार मोहिते, गणेश गायकवाड आधीसह गावातील अनेक नागरिक व वयोवृद्ध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



